उन्हाच्या काहिलीवर उसाचा रस गुणकारी

नवी मुंबई(प्रतिनिधी) - नको नको करणाऱ्या कडक उकाड्यामुळे मुंबई, नवी मुंबई ठाणेकरांना घराबाहेर पडताना सोबत पाणी किंवा उन्हाच्या काहिलीपासून बचावासाठी आपसूक रसवंतीगृहाकडे मोर्चा वळवावा लागतो आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह ठाणे जिल्ह्यात तापमानाचा पारा चाळिशीजवळ येऊ लागला असल्याने शहरवासीयांना गरमीचा सामना करावा लागत आहे.


अशावेळी नागरिकांना विविध शीतपेयांचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र यातील अनेक शीतपेये आरोग्याला घातक असल्याने नारळपाणी, लिंबूपाणी, ताक आणि सर्वात जास्त उसाच्या रसाला पसंती मिळत आहे. यामुळे शहरातील अनेक उसाच्या रसाची विक्री करणाऱ्या रसवंतीगृहांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. ठाणे, नवी मुंबई आणि मुबई शहर परिसरात उन्हाच्या तडाख्याने घशाला कोरड पडत आहे. अशावेळी अनेक जणउसाच्या रसाचे फायदे
उसाच्या रसाचे विविध फायदे आहेत.


उसाचा रस प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो. आरोग्यासाठी फायदेशीर असा उसाचा रस आहे. कावीळ झालेल्या व्यक्तीस हा रस फायदेशीर ठरतो. जलद शक्तिवर्धक म्हणूनदेखील काम करतो. शिवाय शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतो. या रसामध्ये कॅल्शिअम, मॅग्निशियम, आयर्न भरपूर प्रमाणात असते. शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. शरीरातील पचनशक्ती सुधारते. अत्यंत गुणकारी असल्याने नागरिक उसाचा रस पिणे पसंत करतात.


शरीराला थंडावा मिळण्यासाठी गुणकारी अशा उसाचा रसाला पसंती देत आहेत. सध्या शहरामध्ये सरवंतीगृहासह विविध शीतपेये देणाऱ्या गाड्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. चौकाचौकात उसाच्या गाड्यांवर गर्दी होताना दिसत आहे. उष्णतेने
शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे थकवा जाणवतो. अशा वेळी उसाचा ताजा रस प्यायल्याने सगळा थकवा दूर होतो. त्यामुळे उसाचा रस पिण्यासाठी ठाणे स्टेशन परिसर तसेच बाजारपेठेतील रसवंतीगृहावर नागरिक गर्दी करीत आहेत.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत घडली. गौतम

Pratap Sarnaik : गणेशोत्सवात स्वस्तात एसटीने गावी जाता येणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी बसच्या एकेरी गट आरक्षणावर

Devendra Fadnavis : पोलीस ठाण्यांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी करणार

मुंबई : वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन

Vishakha Raut : माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद धोक्यात जात प्रमाणपत्र ठरवले आहेत

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : माहीम येथील प्रभाग क्रमांक १९१ मधून निवडून आलेल्या उबाटाच्या नगरसेविका माजी महापौर

Private Coaching Center : खासगी शिकवणी केंद्रांच्या नियमनासाठी कायद्याच्या प्रारूप मसुद्यावर ४ सप्टेंबरपर्यंत सूचना-हरकती पाठविण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील खासगी शिकवणी केंद्रांच्या नोंदणी व नियमनासाठी स्वतंत्र कायदा करण्याच्या दृष्टीने शासनाने

Mega Block : रविवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; लोकल सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता

Mumbai : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी येत्या रविवारी, दिनांक