नवी मुंबई(प्रतिनिधी) – नको नको करणाऱ्या कडक उकाड्यामुळे मुंबई, नवी मुंबई ठाणेकरांना घराबाहेर पडताना सोबत पाणी किंवा उन्हाच्या काहिलीपासून बचावासाठी आपसूक रसवंतीगृहाकडे मोर्चा वळवावा लागतो आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह ठाणे जिल्ह्यात तापमानाचा पारा चाळिशीजवळ येऊ लागला असल्याने शहरवासीयांना गरमीचा सामना करावा लागत आहे.
अशावेळी नागरिकांना विविध शीतपेयांचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र यातील अनेक शीतपेये आरोग्याला घातक असल्याने नारळपाणी, लिंबूपाणी, ताक आणि सर्वात जास्त उसाच्या रसाला पसंती मिळत आहे. यामुळे शहरातील अनेक उसाच्या रसाची विक्री करणाऱ्या रसवंतीगृहांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. ठाणे, नवी मुंबई आणि मुबई शहर परिसरात उन्हाच्या तडाख्याने घशाला कोरड पडत आहे. अशावेळी अनेक जणउसाच्या रसाचे फायदे
उसाच्या रसाचे विविध फायदे आहेत.
उसाचा रस प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो. आरोग्यासाठी फायदेशीर असा उसाचा रस आहे. कावीळ झालेल्या व्यक्तीस हा रस फायदेशीर ठरतो. जलद शक्तिवर्धक म्हणूनदेखील काम करतो. शिवाय शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतो. या रसामध्ये कॅल्शिअम, मॅग्निशियम, आयर्न भरपूर प्रमाणात असते. शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. शरीरातील पचनशक्ती सुधारते. अत्यंत गुणकारी असल्याने नागरिक उसाचा रस पिणे पसंत करतात.
शरीराला थंडावा मिळण्यासाठी गुणकारी अशा उसाचा रसाला पसंती देत आहेत. सध्या शहरामध्ये सरवंतीगृहासह विविध शीतपेये देणाऱ्या गाड्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. चौकाचौकात उसाच्या गाड्यांवर गर्दी होताना दिसत आहे. उष्णतेने
शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे थकवा जाणवतो. अशा वेळी उसाचा ताजा रस प्यायल्याने सगळा थकवा दूर होतो. त्यामुळे उसाचा रस पिण्यासाठी ठाणे स्टेशन परिसर तसेच बाजारपेठेतील रसवंतीगृहावर नागरिक गर्दी करीत आहेत.