Navneet Rana : नवनीत राणा यांना दिलासा! सुप्रीम कोर्टाने जात प्रमाणपत्र ठरवलं वैध

निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा


अमरावती : भाजपाच्या अमरावतीतील (Amravati) उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांची उमेदवारी एका कारणास्तव अडचणीत आली होती. नवनीत राणा यांच्या अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र (Caste certificate) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) बोगस ठरवले होते. या निकालाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल करण्यात आली. याबाबत आता अपडेट समोर आली आहे. राणा यांचं जात प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टाने वैध ठरवलं आहे, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीतील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत.


काँग्रेसच्या रामटेकमधील उमेदवार रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांची उमेदवारी याच कारणास्तव नाकारली गेली होती. मात्र, नवनीत राणा यांना याबाबत दिलासा मिळाला आहे आणि त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवनीत राणा भाजपच्या कमळावर अमरावतीतून खासदारकीची निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. त्यांनी आज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आज त्या उमेदवारी अर्ज देखील भरणार आहेत.


२०१९ ला नवनीत राणा अपक्ष खासदार होत्या. आता त्या भाजपच्या उमेदवार आहेत. राणा यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर पहिल्यांदा अमरावतीमधून निवडणूक लढवली आणि शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि अडसूळ यांचा पराभव केला.


गेल्या महिन्यात, सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. ८ जून २०२१ रोजी उच्च न्यायालयाने सांगितले की, 'मोची' जात प्रमाणपत्र बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक करून मिळवले गेले. त्यामुळे राणा यांना २ लाखांचा दंडही ठोठावला होता. मात्र, सुप्रीम कोर्टाने हे प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय दिला आहे.

Comments
Add Comment

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनाला ग्रहणाचा सावट नाही, पण सकाळचा मुहूर्त चुकला ? जाणून घ्या दुपारी राखी कधी बांधायची!

आज २८ ऑगस्ट रोजी देशभरात भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि पवित्र नात्याचा 'रक्षाबंधन' हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी