Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीNavneet Rana : नवनीत राणा यांना दिलासा! सुप्रीम कोर्टाने जात प्रमाणपत्र ठरवलं...

Navneet Rana : नवनीत राणा यांना दिलासा! सुप्रीम कोर्टाने जात प्रमाणपत्र ठरवलं वैध

निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा

अमरावती : भाजपाच्या अमरावतीतील (Amravati) उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांची उमेदवारी एका कारणास्तव अडचणीत आली होती. नवनीत राणा यांच्या अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र (Caste certificate) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) बोगस ठरवले होते. या निकालाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल करण्यात आली. याबाबत आता अपडेट समोर आली आहे. राणा यांचं जात प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टाने वैध ठरवलं आहे, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीतील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत.

काँग्रेसच्या रामटेकमधील उमेदवार रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांची उमेदवारी याच कारणास्तव नाकारली गेली होती. मात्र, नवनीत राणा यांना याबाबत दिलासा मिळाला आहे आणि त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवनीत राणा भाजपच्या कमळावर अमरावतीतून खासदारकीची निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. त्यांनी आज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आज त्या उमेदवारी अर्ज देखील भरणार आहेत.

२०१९ ला नवनीत राणा अपक्ष खासदार होत्या. आता त्या भाजपच्या उमेदवार आहेत. राणा यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर पहिल्यांदा अमरावतीमधून निवडणूक लढवली आणि शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि अडसूळ यांचा पराभव केला.

गेल्या महिन्यात, सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. ८ जून २०२१ रोजी उच्च न्यायालयाने सांगितले की, ‘मोची’ जात प्रमाणपत्र बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक करून मिळवले गेले. त्यामुळे राणा यांना २ लाखांचा दंडही ठोठावला होता. मात्र, सुप्रीम कोर्टाने हे प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -