मानुषी छिल्लर श्रद्धा कपूर आणि क्रिती सॅननसोबत 'नो एंट्री' सिक्वेलमध्ये सामील होणार?

मुंबई : मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री तर आहे कारण एकामागे एक सुपरहिट चित्रपट करत ती प्रेक्षकांची मन जिंकून घेत आहे. ‘ऑपरेशन व्हॅलेंटाइन’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि पीरियड-ड्रामा ‘सम्राट पृथ्वीराज’ यांसारख्या ॲक्शनर्सचा शोध घेतल्यानंतर मानुषी एका कॉमेडी चित्रपटात काम करण्यासाठी सज्ज झाली आहे.


सूत्रानुसार मानुषी छिल्लर (Manushi Chhillar), श्रध्दा कपूर (Shraddha Kapoor) आणि कृती सेनन (Kriti Sanon) सह २००५ मध्ये आलेल्या 'नो एंट्री' चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या 'नो एंट्री में एंट्री' (No Entry sequel) च्या प्रतिष्ठित स्टार कास्टमध्ये सामील होणार आहेत. याचा चर्चा सध्या इंडस्ट्रीत जोरदार होताना दिसतात. सूत्रांनी सांगितले की मानुषी अर्जुन कपूर, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ यांच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार असून ती मुख्य भूमिकेत या सिक्वलमध्ये सामील होणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जाहीर झालेल्या या प्रोजेक्ट मध्ये मानुषी पहिल्यांदा क्रिती आणि श्रध्दा स्क्रीन शेयर करणार आहे.


तर ही अभिनेत्री पहिल्यांदाच अर्जुन, वरुण आणि दिलजीतसोबत जोडी करताना दिसणार आहे. आता चर्चा सुरू असताना यावर विश्वास ठेवावा की नाही हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. तर मानुषी, क्रिती आणि श्रद्धा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.


मानुषी छिल्लर वेगवेगळ्या शैलीतील स्क्रिप्ट्स निवडून एक उत्तम अभिनेत्री आहे हे तिने सिद्ध करून दाखवल आहे. ती सध्या अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी करत आहे. हा चित्रपट १० एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार असून या ॲक्शनरच्या रिलीजनंतर मानुषी छिल्लर जॉन अब्राहम स्टारर 'तेहरान'मध्ये दिसणार आहे. दरम्यान क्रिती तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'क्रू'च्या यशाचा आनंद घेत आहे, तर श्रद्धा 'स्त्री २' च्या रिलीजसाठी तयारी करत आहे.

Comments
Add Comment

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Dilip Kumar : ७८ वर्षांपूर्वी गाजलेलं बॉलिवूडचं देशभक्तीपर गाणं! मोहम्मद रफींचा आवाज, दिलीप कुमार यांच्यामुळे अजरामर झालेला इतिहास

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून जातं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की

Swara Bhasker News : स्वरा भास्करचा ट्रोलर्सवर जोरदार हल्लाबोल! 'त्या' एका वाक्याने बंद केली नेटकऱ्यांची बोलती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. फहाद अहमद यांच्याशी

Rakesh Bedi : “भेसळ करणाऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा!”; ‘धुरंधर’ फेम राकेश बेदींची संतप्त मागणी, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : आर्थिक फायद्यासाठी अन्न, पेये आणि मद्यामध्ये भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली

Ajay Devgan : बाॅलिवूडचा सिंघम 'अजय देवगण' लवरकच झळकणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखला जाणारा अभिनेता 'अजय देवगण' आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर