पुण्यात सात दरोडेखोरांचा घरावर सशस्त्र दरोडा; १६ लाखांचा मुद्देमाल लंपास

पुणे : दिवसागणिक चोरीच्या घटना वाढत असताना त्यातच पुण्यातील नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात असणाऱ्या बिवरी गावातील एका घरावर मध्यरात्री सात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. दरोडेखोरांनी महिलांना शस्त्राचा धाक दाखवून तब्बल १६ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.


प्रशांत गोते आणि त्यांचे कुटुंब मंगळवारी रात्री जेवण करून झोपले. मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास सात ते आठजण त्यांच्या घराजवळ आले. त्यांच्याकडे तीक्ष्ण शस्त्रे होती. घराचा दरवाजा कटावणीने उखडण्यात आल्याने गोते कुटुंबीय झोपेतून जागे झाले. दरोडेखोर गोते कुटुंबीयांच्या घरात शिरले. गोते कुटुंबीयाला चाकू, तसेच तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखविण्यात आला. दरोडखोरांनी शयनगृहातील कपाटामधील पाच लाखांची रोकड आणि दागिने काढून घेतले.


याबाबत प्रशांत विलास गोते यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी गोते कुटुंबातील महिलांच्या गळ्याला चाकू लावून मारण्याची धमकी दिली. व त्यांचे अंगावरील दागिने काढून घेण्यात आले. दरोडेखोरांनी प्रशांत गोते यांच्या आईला आणि बहिणीला मारहाण केली. अशी माहिती लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे यांनी दिली.


दरोडा टाकल्यानंतर चोरट्यांनी पोलिसांशी संपर्क साधू नये यासाठी कुटुंबातील सर्वांचे मोबाइल संच फोडण्यात आले. पसार झालेल्या चोरट्यांचा मार्ग काढण्याठी लोणीकंद पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. दरोडा पडल्यानंतर बिवरी गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार मुंबई : "राज्य विधिमंडळाचे सोमवारपासून

Kolhapur : कोल्हापुरात नवीन उद्योगांना बळ

 ४७.६३ हेक्टर शासकीय गायरान जमीन एमआयडीसीला; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ

Pandarpur Mandir : पंढरपूर मंदिरातील लेपन प्रक्रियेवरील स्थगिती अर्ज न्यायालयाने नाकारला

सोलापूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींवर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार करण्यात येणाऱ्या लेपन

Monsoon Delay : जिल्ह्यात ३० जूनपर्यंत जलतरण तलाव बंद

अलिबाग : जिल्ह्यातील उष्ण व दमट हवामान, मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब, कमी पर्जन्यमान आणि उपलब्ध जलसाठ्यातील

Parbhani Temple Collapse : परभणीत भीषण दुर्घटना; मंदिरातील बांधकामाचा भाग कोसळून 7 भाविकांचा मृत्यू

परभणी : महाराष्ट्रातील परभणी (Parbhani) जिल्ह्यातील यशवाडी देवस्थान हनुमान मंदिरात शनिवारी मोठी दुर्घटना घडली. मंदिर

Pune Crime : किरकोळ वादाचे हिंसक रूपांतर; पुण्यात गुंडाकडून हल्ल्याचा प्रयत्न

Pune Crime : पुणे :  पुण्यातील (Pune) पाटील इस्टेट परिसरात एका किरकोळ वादातून मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. गाडी