पुणे : दिवसागणिक चोरीच्या घटना वाढत असताना त्यातच पुण्यातील नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात असणाऱ्या बिवरी गावातील एका घरावर मध्यरात्री सात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. दरोडेखोरांनी महिलांना शस्त्राचा धाक दाखवून तब्बल १६ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
प्रशांत गोते आणि त्यांचे कुटुंब मंगळवारी रात्री जेवण करून झोपले. मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास सात ते आठजण त्यांच्या घराजवळ आले. त्यांच्याकडे तीक्ष्ण शस्त्रे होती. घराचा दरवाजा कटावणीने उखडण्यात आल्याने गोते कुटुंबीय झोपेतून जागे झाले. दरोडेखोर गोते कुटुंबीयांच्या घरात शिरले. गोते कुटुंबीयाला चाकू, तसेच तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखविण्यात आला. दरोडखोरांनी शयनगृहातील कपाटामधील पाच लाखांची रोकड आणि दागिने काढून घेतले.
याबाबत प्रशांत विलास गोते यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी गोते कुटुंबातील महिलांच्या गळ्याला चाकू लावून मारण्याची धमकी दिली. व त्यांचे अंगावरील दागिने काढून घेण्यात आले. दरोडेखोरांनी प्रशांत गोते यांच्या आईला आणि बहिणीला मारहाण केली. अशी माहिती लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे यांनी दिली.
दरोडा टाकल्यानंतर चोरट्यांनी पोलिसांशी संपर्क साधू नये यासाठी कुटुंबातील सर्वांचे मोबाइल संच फोडण्यात आले. पसार झालेल्या चोरट्यांचा मार्ग काढण्याठी लोणीकंद पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. दरोडा पडल्यानंतर बिवरी गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…