मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४साठी(loksabha election 2024) काँग्रेसने उमेदवारांची आणखी एक यादी सोमवारी रात्री जाहीर केली. पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या १०व्या यादीत दोन नावे आहेत यातील एक महाराष्ट्रातून तर दुसरे नाव दक्षिण भारतातील तेलंगणा येथून आहे.
पक्षाने आतापर्यंत २१४ उमेदवारांची घोषणा केलेली आहे. काँग्रेसने याआधी नऊ वेगवेगळ्या यादींमधून २१२ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. सोमवारी रात्री त्यांनी अकोला आणि तेलंगणाच्या वारंगल येथून उमेदवाराच्या नावाची घोषणा केली.
अकोला येथून काँग्रेसकडून अभय काशीनाथ पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर तेलंगणामधील वारंगल येथून कादियाम काव्य यांना उमेदवारी दिली आहे.
दरम्या, अकोला मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत अकोलाच्या जागेवर भाजपने विजय मिळवला होते. भाजपचे संजय शामराव धोत्रे येथून खासदार म्हणून निवडून आले होते. ते सलग पाचवेळा लोकसभा निवडणूक जिंकले आहेत.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…