नवी मुंबई : नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमध्ये भीषण आगीची (Navi Mumbai MIDC Fire) घटना घडली आहे. आज सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीमध्ये (Navabharat Industrial Chemical Company) ही आग लागली आणि रस्त्यावर पसरलेल्या रसायनांमुळे आजूबाजूच्या भागात ही आग पसरली. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आगीचे व्हिडिओ समोर आले आहेत. आगीचे लोट हे रस्त्यापर्यंत पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांसह स्थानिक देखील आगीवर नियत्रंण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही.
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…