Financial year 2024-25 : नव्या आर्थिक वर्षात कोणत्या गोष्टी महागल्या आणि कशाचे दर घसरले?

Share

जाणून घ्या नव्या आर्थिक नियमांबदद्ल संपूर्ण माहिती…

नवी दिल्ली : आजपासून भारतात नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होत असून अनेक आर्थिक नियमांमध्ये बदल झाला आहे. अनेक गोष्टींच्या किंमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला नव्या वर्षात कात्री बसणार आहे. पण त्यासोबतच काही जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्यात आले आहेत. या नवीन वर्षात कोणते नवे आर्थिक नियम लागू झाले आहेत, हे जाणून घेऊयात.

एलपीजी सिलेंडर स्वस्त

आजपासून एलपीजी सिलेंडर स्वस्त झाला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत कमी करण्यात आली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडर ३०.५० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. मात्र, १४ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

औषधे महागली

१ एप्रिलपासून अनेक औषधांच्या किमती वाढल्या आहेत. सरकारने औषध उत्पादकांना १२ टक्क्यांनी किमती वाढवण्याची परवानगी दिली आहे. औषध किंमत नियामकाने नॅशनल लिस्ट ऑफ अत्यावश्यक औषधांच्या (NLEM) अंतर्गत व्हिटॅमिन गोळ्या, स्टिरॉइड्स, पेन किलर, टीबी, कॅन्सर, मलेरिया, एचआयव्ही एड्स, अँटी-बायोटिक्स, अँटी-डोट्स, ॲनिमिया, डिमेंशिया औषधे, बुरशीविरोधी औषधे, हृदयविकाराची औषधे, त्वचा रोग संबंधित औषधे, प्लाझ्मा, जंतुनाशक औषधे यांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर बोजा वाढणार आहे.

नवीन कर प्रणाली डिफॉल्ट

नवीन आर्थिक वर्षात नवीन कर प्रणाली डीफॉल्ट कर प्रणाली बनली आहे. त्यामुळे टॅक्स रिटर्न भरताना लक्ष द्यावे लागेल. जर तुम्ही आयकर रिटर्न भरताना जुनी कर व्यवस्था निवडली नसेल, तर तुम्ही आपोआप नवीन कर प्रणालीमध्ये याल. या अंतर्गत तुम्हाला आपोआप कर भरावा लागणार आहे. नव्या कर प्रणालीत ७ लाख रुपयांपर्यंत करपात्र उत्पन्न असलेल्या लोकांना कोणताही आयकर भरावा लागणार नाही.

केवायसी नसल्यास फास्टॅग बंद

आजपासून केवायसी नसल्यास फास्टॅग काम करणार नाही. जर तुम्ही ३१ मार्चपर्यंत फास्टॅग केवायसी अपडेट केलं नसेल तर टोल भरणं कठीण होईल. आजपासून तुमचा फास्टॅग निष्क्रिय होईल.

एनपीएस खाते लॉगिन नियम बदलला

एनपीएस खात्यात लॉगिन करण्याचा नियम आजपासून बदलला आहे. आता एनपीएस खात्यात लॉगिन करण्यासाठी, तुम्हाला आयडी पासवर्डसह आधारकार्डशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करावा लागेल, त्यानंतरच तुम्हाला लॉगिन करता येईल.

ईपीएफओ खाते हस्तांतरण

एखाद्या कर्मचाऱ्याने नवीन आर्थिक वर्षात नोकरी बदलल्यास, त्याचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) खाते आपोआप नवीन कंपनीकडे हस्तांतरित केले जाईल. आतापर्यंत कर्मचाऱ्यांना खाते हस्तांतरित करण्यासाठी निवेदन द्यावे लागत होते, आता त्याची गरज भासणार नाही.

विमा पॉलिसी नियमात बदल

आजपासून विमा पॉलिसी सरेंडर करण्याचे नियमही बदलले आहेत. आता सरेंडर व्हॅल्यू तुम्ही किती वर्षांनी पॉलिसी सरेंडर केली आहे, यावर अवलंबून असेल.

SBI च्या ग्राहकांना फटका

SBI डेबिट कार्डचे वार्षिक देखभाल शुल्क आजपासून वाढले आहे, त्यामुळे SBI च्या ग्राहकांना फटका बसणार आहे. याशिवाय, SBI क्रेडिट कार्डद्वारे भाडे पेमेंट केल्यावर मिळणारे रिवॉर्ड पॉइंट देखील आजपासून उपलब्ध होणार नाहीत.

Recent Posts

मुंबई ३.० व्हिजनला मिळणार गती, मुंबईला जागतिक दर्जाचे स्मार्ट शहर घडविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

एमएमआरडीए महानगर आयुक्त यांची कोरियन उच्चस्तरीय शिष्टमंडळाने घेतली भेट मुंबई : मुंबई हे जागतिक मानकांनुसार…

1 hour ago

RCB vs PBKS, IPL 2025: बंगलोरच्या मैदानावर पंजाब किंग्सचा ‘रॉयल’ विजय

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…

8 hours ago

युनेस्कोच्या यादीत भगवद्गीतेचा समावेश

नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…

10 hours ago

हिंदी भाषा सक्ती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक

घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…

11 hours ago

गुन्ह्याची माहिती असताना वैभव नाईक यांनी ती का लपवली? आमदार निलेश राणे यांचा सवाल

या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…

11 hours ago

नवी मुंबईत २८३.७०० किलो प्लास्टिक जप्त

नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…

11 hours ago