मुंबई: भारतीय हवामान विभागाने उन्हाळ्याबाबत आपले अंदाज व्यक्त केले आहे. आयएमडीने व्यक्त केलेल्या शक्यतेनुसार या उन्हाळ्यात उन्हाचा पारा खूप वाढणार असून उष्णतेच्या लाटा अधिक असण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मते एप्रिल ते जूनपर्यंत देशातील अधिकतर भागात तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पूर्व, उत्तरपूर्व आणि उत्तर पश्चिम भारतातील काही भागात सामन्यपेक्षा कमी तापमान असण्याची शक्यता आहे. तर उत्तर-पूर्व आणि उत्तर पश्चिमच्या काही भागांना सोडल्यास देशातील अधिकांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
एप्रिल महिन्याबाबत जारी केलेल्या पूर्वानुमानानुसार भारताच्या अधिकांश भागात सामान्यपेक्षा अधिक तापमान राहील. तर पूर्व, उत्तर-पूर्व आणि उत्तर पश्चिम भारतातील एक अथवा दोन भाग सोडले तर किमान तापमान सामन्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
उन्हाच्या वाढत्या पारासोबत देशभरात उष्णतेच्या लाटांमध्येही वाढ होऊ शकते. हवामान विभागाचे म्हणणे आहे की दक्षिण प्रायद्वीच्या अधिकांश भाग मध्य भारत, उत्त पश्चिमच्या मैदानी भागात सामान्यपेक्षा अधिक उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. तर एप्रिल महिन्यात अधिक उष्णता असणार असल्याचे सांगितले जात आहे.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…