Chandrashekhar Bawankule : 'ठगो का मेला' कार्यक्रमासाठी उबाठाचे टोमणेसम्राट पोहोचले दिल्लीत

'१०० कोटी वसुली फाईल्स'ची स्क्रिप्ट तयार, चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला


मुंबई : 'ठगो का मेला' कार्यक्रमासाठी उबाठाचे टोमणेसम्राट दिल्लीत पोहोचले आहेत, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. बावनकुळे यांनी ट्वीटरवर एक पोस्ट करत उद्धव ठाकरेंना चांगलीच चपराक लगावली आहे.


देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींनी सावरकर सिनेमा पाहावा असं म्हटलं होतं. त्यांच्या तिकीटाची आणि एकट्याला थिएटरमध्ये बसून सिनेमा पाहता येईल याची व्यवस्था मी करतो, असं ते म्हणाले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांचा येण्या-जाण्याचा, राहण्या-खाण्याचा खर्च मी स्वतः करतो, पण त्यांनी मणिपूरला जावं असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. त्यांच्या या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.



चंद्रशेखर बावनकुळे यांची ट्विटर पोस्ट


चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स मीडियावरून प्रत्युत्तर देत पोस्टमध्ये लिहीलं आहे, मद्य घोटाळ्याचे आरोपी अरविंद केजरीवाल यांच्या बचावासाठी आयोजित 'ठगो का मेला' कार्यक्रमासाठी उबाठा गटाचे नेते आणि टोमणेसम्राट उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले आणि टोमणे मारण्याचा कार्यक्रम केला. देवेंद्रजींनी पिक्चर काढायचा ठरवलाच तर '१०० कोटी वसुली फाईल्स'ची स्क्रिप्ट तयार आहे. त्याची काळजी उद्धव ठाकरेंनी करू नये.


याशिवाय 'वाझे की लादेन फाईल्स', 'खिचडी फाईल्स', 'कोविड बॅग फाईल्स' असे अनेक चित्रपट काढता येतील. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी टोमणे मारण्यापूर्वी घरात बसून केलेल्या अडीच वर्षाच्या कारभाराचा विचार करावा. बाकी तुम्ही देवेंद्रजींना कितीही टोमणे मारले तरी महाराष्ट्रातील जनता लोकसभा निवडणुकीत तुम्हाला कायमचा टोमणा मारल्याशिवाय राहणार नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Comments
Add Comment

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ