Friday, June 20, 2025

Archana Patil: सासरे काँग्रेसमध्ये पण सून देणार भाजपाला साथ!

Archana Patil: सासरे काँग्रेसमध्ये पण सून देणार भाजपाला साथ!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत डॉ. अर्चना पाटील यांचा पार पडणार पक्षप्रवेश


मुंबई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बॉलीवूड ॲक्टर्ससह बडे-बडे नेते भाजपा पक्षात प्रवेश करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून डॉक्टर अर्चना पाटील या भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती, आता त्या चर्चेचे निवारण होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पंजाबचे माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ. अर्चना शैलेश पाटील चाकूरकर या शनिवारी मुंबई येथे भाजपा पक्षात प्रवेश करणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे.


मागील महिन्यात शिवराज पाटील चाकूरकर यांचे कट्टर समर्थक मंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर या चर्चेने अधिक जोर घेतला होता. आता प्रवेशाची निर्धारित तारीख ठरल्यामुळे डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रवेशाला निश्चित स्वरूप येणार आहे. या प्रवेशामुळे लातूर ,धाराशिव, नांदेड जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलतील असे मानले जाते. त्यामुळे आता अर्चना पाटील यांच्या प्रवेशामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची ताकद आणखी वाढणार आहे.

Comments
Add Comment