”पश्चिम बंगालमध्ये ईडीने जप्त केलेली मालमत्ता जनतेला मिळावी, यासाठी आम्ही काम करत आहोत.” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केल्याचं पश्चिम बंगालच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज अशी मोठी घोषणा केल्याचं समोर आले आहे. कृष्णानगर लोकसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार महुआ मोईत्रा यांच्या विरोधातील भाजपा उमेदवार अमृता रॉय रिंगणात आहेत. रॉय यांच्यासोबत टेलिफोनवरील संभाषणात नरेंद्र मोदींनी हा मुद्दा मांडला आहे.
”जे गरीबांचे तीन हजार कोटी रुपये आहेत, ज्यांनी लाचेच्या स्वरुपात पैसे दिले आहेत त्यांना ते परत करण्याची माझी इच्छा आहे.” असं पंतप्रधान मोदी यांनी वक्तव्य मांडल्याचं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. ईडीने जप्त केलेले तीन हजार कोटी रुपये परत देण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधत असल्यामुळे,बंगाली लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवावा असेदेखील पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
अमृता रॉय ह्या पूर्वाश्रमीच्या राजघराण्यातील सदस्य आहेत. त्यांच्याशी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी सध्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करत आहे. ईडीने पश्चिम बंगालमध्ये तीन हजार कोटी रुपये अटॅच केले आहेत. हा पैसा गरीबांचा आहे. कुणी शिक्षक बनण्यासाठी पैसे दिले, तर कुणी क्लार्क बनण्यासाठी पैसे दिले. सध्या यासंदर्भात कायदेशीर बाबींचा ते अभ्यास करत असून त्यांची अशी इच्छा आहे की, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर कायदेशीर तोडगा काढला जाईल आणि नियम बनवाला जाईल.
पंतप्रधान मोदी आणि रॉय यांच्यात झालेल्या संवादाचं विवरण देताना पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की, लाचेच्या स्वरुपात दिलेली तीन हजार कोटी रुपयांबाबत लोकांना जागरुक करुन सत्तेत आल्यानंतर तातडीने हे पैसे देण्यासाठी मार्ग शोधला जाणार असल्याचा पंतप्रधानांनी अंदाज वर्तवला.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…