Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीPawar Vs Fadnavis: शरद पवारांना फडणवीसांकडुन पुन्हा एकदा धोबीपछाड...

Pawar Vs Fadnavis: शरद पवारांना फडणवीसांकडुन पुन्हा एकदा धोबीपछाड…

गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर आणि विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यातच रासपचे प्रमुख महादेव जानकर यांच्या आणि शरद पवार यांच्यात बैठका वाढल्या होत्या. दरम्यान शरद पवार यांनी महादेव जानकर यांच्यासाठी माढा लोकसभेची जागा सोडण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे शरद पवार यांच्याकडून महायुती फोडण्याची तयारी सुरू असल्याचे म्हटले जात होते.

महादेव जानकरांनी माढा आणि परभणी या जागांसाठी महाविकास आघाडीकडे मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांनी शरद पवार यांच्यासोबत बैठक सकारात्मक झाल्याचे सांगत शरद पवार यांचे आभार मानले होते. तर दुसरीकडे महायुतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसंग्राम पक्षाच्या ज्योती मेटे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर शरद पवार महायुतीतील घटक पक्ष आपल्या बाजूला वळवून देवेंद्र फडणवीस यांना धक्का देणार असल्याचे म्हटले जात होते.

महादेव जानकर यांनी शरद पवार यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका ही केली होती. या घटनेला चार दिवस उलटले नाही तोच देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकर यांना स्वगृही आणण्यात यश मिळवले आहे. यावेळी महादेव जानकर यांची मनधरणी करताना देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनील तटकरे आणि प्रसाद लाड उपस्थित होते.

एकीकडे महादेव जानकर यांना पुन्हा महायुतीत आणल्यानंतर दुसऱ्या बाजूला विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे महादेव जानकर, ज्योती मेटे यांची भेट घेत शरद पवार यांनी मोठा डाव टाकल्याची चर्चा असतानाच उपमुख्यमंत्री फडणवीसांनी शरद पवारांचा धोबीपछाड दिलाचे म्हटले जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -