नवी दिल्ली: दिल्लीमध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाकडून अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरूंगातूनच सरकार चालवत आहेत. त्यांनी रविवारी सकाळी तुरूंगातून पहिला आदेश जारी केला. त्यांचा हा आदेश दिल्ली सरकारच्या जल मंत्रालयाशी संबंधित आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी हा आदेश अटकेच्या तीन दिवसांनी जारी केला आहे. तर त्यांच्या अटकेविरोधात आम आदमी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांचे विरोध प्रदर्शन दिल्लीसह विविध शहरांमध्ये सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक नोटच्या माध्यमातून जल मंत्र्यांना आपले आदेश जारी केले. दिल्ली सरकारमध्ये जल मंत्री आतिशी रविवारी त्यांच्यासोबत एक प्रेस कॉन्फरन्स करू शकते.
दुसरीकडे दिल्ली हायकोर्टाने ईडीच्या अटकेविरोधात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या तत्काळ सुनावणीवर नकार दिला. न्यायालय त्यांच्या याचिकेवर २७ मार्च २०२४ला सुनावणी करेल. आपल्या या याचिकेत त्यांनी ईडीकडून स्वत:ला केलेली अटक आणि ट्रायल कोर्टाचे आदेश चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल अंमलबजावणी संचलनालयाने २१ मार्च तथाकथित दारू घोटाळा प्रकरणात अटक केली होती. ईडीने सीएमला अटक केल्यानंर दुसऱ्याच दिवशी राऊज एव्हेन्यू कोर्टात सादर केले. न्यायालयाने २८ मार्चपर्यंत ईडीच्या कस्टडीत पाठवले होते.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…