IPL 2024 : मराठमोळा ऋतुराज गायकवाड सांभाळणार CSKचे कर्णधारपद!

Share

महेंद्रसिंग धोनीने दिली जबाबदारी

मुंबई : सध्या क्रिकेटप्रेमींमध्ये (Cricket lovers) आयपीएलची (IPL 2024) जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) चाहत्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) अचानक कर्णधारपद सोडले असून ही जबाबदारी त्याने मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) खांद्यावर सोपवली आहे. धोनीने गेल्या मोसमात चेन्नईला पाचव्यांदा आयपीएल जिंकून दिले होते आणि आता त्याने संघाची कमान ऋतुराज गायकवाडकडे सोपवली आहे. आयपीएलने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली.

आयपीएलने आज सर्व कर्णधार (Captains) आणि ट्रॉफीसह फोटो एक्सवर शेअर केला. या फोटोत चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या ऐवजी फोटोसेशनला ऋतुराज गायकवाडने उपस्थिती लावली. ‘टाटा आयपीएल सुरू होत आहे. आम्ही रॉक अँड रोलसाठी सज्ज झालो आहोत. सादर करत आहोत ९ कर्णधार. पंजाब किंग्जचा उपकर्णधार जितेश शर्मा संघाचं फोटोसाठी प्रतिनिधित्व करत आहे’, असं आयपीएलने या फोटोला कॅप्शन दिलं आहे.

उद्यापासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १७व्या हंगामाचा पहिला सामना सीएसकेचा आरसीबीविरुद्ध होणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने गेल्या मोसमात अंतिम सामन्यात गुजरात जायंट्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. यावेळेस ऋतुराज ही जबाबदारी कशी निभावणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

याआधीही धोनीने सोडले होते कर्णधारपद

धोनीने कर्णधारपदाची जबाबदारी सोडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही आयपीएल २०२२ मध्ये संघ व्यवस्थापनाने कर्णधारपदात बदल केले होते. धोनीच्या जागी स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला कर्णधार बनवण्यात आले. मात्र, तो ही जबाबदारी नीट पार पाडू शकला नाही. त्यामुळे त्याने हंगामाच्या मध्यातच संघ सोडला आणि कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. यानंतर धोनीने पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सांभाळली.

Recent Posts

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

42 minutes ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

7 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

8 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

8 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

9 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

9 hours ago