देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज
अरविंद केजरीवाल यांना अटकेपासून दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; ईडीचे पथक धडकले केजरीवाल यांच्या घरी
March 21, 2024 09:09 PM
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळा प्रकरणात अटकेपासून दिलासा देण्यास नकार देत दिल्ली उच्च न्यायालयाने ईडीकडून उत्तर मागितले आहे. उच्च न्यायालयात या प्रलंबित याचिकेसह या याचिकेवरही २२ एप्रिलला सुनावणी होणार आहे.
दिल्ली उच्च न्यायालयात लंच ब्रेकनंतर सुरू झालेल्या सुनावणीदरम्यान ईडीने कोर्टाला सांगितले की कोणत्या पुराव्यांच्या आधारे केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले जात आहे. ईडीने न्यायालयाला आग्रह केला होता की तथ्ये केवळ न्यायालयाने पाहावीत. अरविंद केजरीवाल यांच्या वकीलांना दाखवू नये. ईडीकडून सांगण्यात आले की हे कोणतीही निवडणूक लढवत नाहीत. ते विपश्यनेला कधीही जातात मात्र ईडीकडे जात नाहीत. कोर्टाने ईडीला म्हटले की तुम्ही इतके समन्स पाठवले आहेत तर सरळ अटक का करत नाहीत.
ईडीने म्हटले की आम्हाला त्यांची बाजू जाणून घ्यायची आहे. त्यांनी आमच्यासमोर येऊन आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.
ईडीचे पथक धडकले केजरीवाल यांच्या घरी
दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटकेपासून दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाचे पथक आज गुरुवारी संध्याकाळी केजरीवाल यांच्या घरी पोहोचले. केजरीवाल आज ईडीच्या ९ व्या समन्सवर हजर झालेले नव्हते. त्यानंतर ईडीची तपास यंत्रणा थेट केजरीवाल यांच्या घरी धडकली आहे.
देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
September 17, 2025 08:49 AM
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१७ सप्टेंबर) आपला ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त त्यांना
देशताज्या घडामोडी
September 17, 2025 07:37 AM
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा
नवी दिल्ली : पंत
देशमहत्वाची बातमी
September 17, 2025 06:30 AM
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी संध्याकाळी उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशताज्या घडामोडी
September 16, 2025 05:05 PM
नवी दिल्ली: दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं
देशमहत्वाची बातमी
September 16, 2025 01:48 PM
डेहराडून: उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा ढगफुटीने कहर केला आहे. उत्तराखंडची राजधानी असलेल्या डेहराडून येथील
देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
September 16, 2025 12:13 PM
‘गुगल जेमिनाय’च्या (Google Gemini) नॅनो बनाना एआय फीचरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. असंख्य नेटकरी आपले फोटो