नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) काल मध्यरात्रीच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली. ईशान्य दिल्लीतील वेलकम भागातील कबीर नगरमध्ये बांधकाम सुरू असलेली जुनी इमारत अचानक कोसळली (Building collapsed). या अपघातात दोन मजुरांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री २:१६ च्या सुमारास ही इमारत कोसळली. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कोणीही राहत नव्हते. तळमजल्यावर काम सुरू होते. मध्यरात्रीच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे स्थानिक लोकांना सुरुवातीला काहीच समजले नाही, नंतर त्यांना एक घर कोसळल्याचे समजले. अपघाताची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. यानंतर मदत आणि बचाव कार्य राबविण्यात आले.
ढिगाऱ्याखाली तीन मजूर गाडले गेले. तिघांनाही बाहेर काढण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातात जखमी झालेल्या दोघांना जीटीबी रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. तिसऱ्या मजुराची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर जीटीबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाहीद असे इमारतीच्या मालकाचे नाव आहे. त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल, असे दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या पुढील तपास सुरू आहे.
कबीर नगर येथील घर कोसळण्याच्या घटनेतील मृतांची ओळख पटली आहे. या अपघातात अर्शद, वय ३० वर्षे, तौहीद वय २० वर्षे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर रेहान वय २२ वर्षे हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…