Sunday, July 6, 2025

UPSC CSE 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यूपीएससी परीक्षेच्या तारखा ढकलल्या पुढे

UPSC CSE 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यूपीएससी परीक्षेच्या तारखा ढकलल्या पुढे

आता कधी होणार परीक्षा?


नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) UPSC CSE 2024 पूर्वपरीक्षा (Prelims) पुढे ढकलली आहे. ही परीक्षा २६ मे रोजी होणार होती. मात्र, याच दिवशी लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) तारीख आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगाने अधिसूचना जारी करून नवीन तारीखही जाहीर केली आहे. UPSC CSE 2024 प्रिलिम्स परीक्षा आता १६ जून २०२४ रोजी घेतली जाईल. तर UPSC CSE 2024 ची मुख्य परीक्षा २० सप्टेंबर ते ५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत घेतली जाईल.


केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या शुक्रवारी लोकसभा निवडणुकीसाठी तारखा जाहीर केल्या. लोकसभा निवडणुका १९ एप्रिल ते १ जून या दरम्यान सात टप्प्यात होत आहे. तर निकाल ४ जूनला जाहीर होतील. त्यामुळे या दरम्यान UPSC च्या होणाऱ्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.


UPSC CSE 2024 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ मार्च २०२४ होती. अर्जातील दुरुस्तीसाठी ७ मार्च ते १३ मार्च २०४ ही मुदत देण्यात आली होती. UPSC पूर्व परीक्षेसाठी एकूण ८० केंद्रे घेतली जातील आणि मुख्य परीक्षा एकूण २४ केंद्रांवर घेतली जाईल.


Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा