Uddhav Thackeray : 'उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा सत्यानाश करून टाकला!' संतोष बांगरांची सणसणीत टीका

  126

'माकडापाशी काकडा दिला, त्याचे मांडले दुकान' म्हणत संजय राऊतांवरही केली खोचक टीका


संजय राऊत आणि अंबादास दानवे यांचा केला 'लाळचाटे' असा उल्लेख


हिंगोली : लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लगेच हिंगोली (Hingoli) दौरा केला. यावेळी त्यांनी शिवेसेनेचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यावर टीका केली. पोलिसांच्या धाडी पडल्यावर संतोष बांगर माझ्याकडे यायचा असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा सत्यानाश करून टाकला असं म्हणत बांगर यांनी ठाकरेंवर सणसणीत टीका केली आहे. यासोबतच त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व अंबादास दानवे यांच्यावर देखील टीका केली आहे.


आमदार संतोष बांगर म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हातात सोपवली होती, मात्र, तीच शिवसेना संपवण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले. त्यांच्या पक्षात असतांना संतोष बांगर सारखा ढाण्या वाघ पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणायचे. सर्व जिल्हाप्रमुखांमध्ये नंबर एकचा कोणी जिल्हाप्रमुख असेल तर हिंगोलीचा संतोष बांगर असल्याचे म्हणायचे. दंगल झाल्यावर अन्याय होऊ नये म्हणून संतोष बांगर जायचा आणि त्याला मातोश्रीवर बोलावून प्रशंसा केली जायची. काल मी मुंबईत असतांना एक म्हातारी भेटली आणि मी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत असल्याचे तिला महित झाल्याने तिने माझी पाठ थोपटली. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा सत्यानाश करून टाकला, यामुळे अक्षरशः वेदना होतात," असे बांगर म्हणाले.



उद्धव ठाकरेंचे सर्व चेलेचपाटे खंडण्या बहाद्दूर


पुढे बांगर म्हणाले की, “आम्ही काम करून जमीन भुसभुशीत केली, पण काळाच्या सभा पाहता काय परिस्थिती झाली. २०१९ मध्ये मला उमेदवारी मिळाली त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या सभेला किती जनसमुदाय होता. पण, कालच्या सभेला काय परिस्थिती होती, सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यासाठी सक्षम नेतृत्व लागते आणि माणूस देखील तसा लागतो. मात्र, उद्धव ठाकरेंनी जे काही चेलेचपाटे जमा केले ते सर्व खंडण्या बहाद्दूर असल्याच" बांगर म्हणाले.



माकडापाशी काकडा दिला, त्याचे मांडले दुकान


दरम्यान, याचवेळी संतोष बांगर यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर सुद्धा टीका केली. 'माकडापाशी काकडा दिला, त्याचे मांडले दुकान' असं म्हणत बांगर यांनी टीका केली. संजय राऊत यांनी पक्षाची राखरांगोळी करून टाकली आहे. आपण या मूर्ख लोकांसोबत असल्याचं उद्धव ठाकरे यांना समजत कसं नाही? याच मूर्ख लोकांच्या नादी लागून ठाकरेंनी पक्षाचा सत्यानाश करून टाकला. संजय राऊत आणि अंबादास दानवे (Ambadas Danave) लाळचाटे लोकं आहेत. या लोकांच्या नादी लागू नये, कारण अजूनही वेळ गेलेली नाही. उद्धव ठाकरेंनी सरळसरळ भाजपच्या सोबत यायला पाहिजे" असंही बांगर म्हणाले आहेत.

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची