मुंबई : ‘आज सामना वृत्तपत्रात भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचं लंगोट घातलं आहे हे लिहिणारा कोण तर हाताच्या पंजाचं डायपर घालून आजकाल महाराष्ट्रात जो नंगा नाच करतोय तो संजय राजाराम राऊत (Sanjay Raut). तो म्हणतो की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) इंदिरा गांधींचं (Indira Gandhi) मुंबईत स्वागत केलं होतं. मुळात ज्याला शिवसेनेचा इतिहास माहित नाही, ज्याला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच कळले नाही, तोच अशा पद्धतीची बेजबाबदार वक्तव्यं करु शकतो’, असा जोरदार हल्लाबोल भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला. शिवाजी पार्कवर इंडिया अलायन्सच्या (INDIA Alliance) सभेसाठी स्वतःच्या हिंदुत्वासी तडजोड करणार्या संजय राऊत व उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) नितेश राणे यांनी चांगलेच खडे बोल सुनावले.
नितेश राणे म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधींचं स्वागत केलं असेल पण उद्धव ठाकरेंसारखं त्यांच्यासमोर लोटांगण घातलं नाही, उद्धव ठाकरेंसारखं हिंदुत्वासोबत कधी तडजोड केली नाही. बाळासाहेबांचा शब्द हा बंदुकीच्या गोळीसारखा असायचा आणि त्यांनी उभ्या आयुष्यात कधीही आपल्या सिद्धांताशी तडजोड केली नाही, कधीही आपला शब्द बदलला नाही, काँग्रसेच्या मांडीला मांडी लावण्याचा त्यांनी कधी विचारही केला नाही. त्यामुळे उगाच स्वतःचं पाप हे बाळासाहेबांच्या नावाने खपवण्याचं काम संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाने करु नये. महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरे काय होते हे चांगल्या पद्धतीने माहित आहे. त्या शिवाजी पार्कच्या सभेनंतर विरोधकांचं सोडा, पण जुने शिवसैनिक देखील त्यानंतर एक रात्रही नीट झोपले नाही आहे. त्यांच्या मनाची खदखद ही येणार्या लोकसभेमध्ये या उबाठाला कळेल आणि उद्धव ठाकरेंनाही बाळासाहेबांच्या कडवट सैनिकाची काय ताकद आहे, हे कळेल, असं नितेश राणे म्हणाले.
मनसे-महायुतीत सामील होण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले, तो निर्णय अखेर आमच्या पक्षश्रेष्ठींचा आहे आणि काय होणार हे येत्या काही तासांत कळेलच. पण राजसाहेबांच्या येण्याने जर हिंदुत्व मजबूत होणार असेल, जर प्रचार आणि प्रसार आणखी भक्कम पद्धतीने वाढवण्याची संधी असेल आणि आम्हाला ओरिजीनल ठाकरे भेटणार असतील, कारण उद्धव ठाकरे हा चायनीज मॉडेल आहे, कुठल्याही बाबीमध्ये तो ओरिजीनल नाही त्याचं बर्थ सर्टिफिकेट तपासण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ज्यांच्यामध्ये आम्हाला बाळासाहेबांचा प्रत्येक गुण पाहायला मिळतो ते राजसाहेब जर आमच्यासोबत येत असतील, तर आम्ही त्यांचं स्वागतच करु, असं नितेश राणे म्हणाले.
काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले, जसं आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले होते, तसं ही फक्त सुरुवात आहे. अजून टप्प्याटप्प्याने खूप यायचे आहेत. अजून रांग लागलेली आहे. राहुल गांधींचा पायगुण हा आमच्या भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत शुभ आहे. त्यांनी असाच सगळीकडे पाय टाकत जावं, कारण जिथे जिथे ते पाय टाकतात तिथे काँग्रेसवाले त्यांना सोडतात. त्यामुळे प्रिया दत्त ही तर फक्त सुरुवात आहे, पुढे पुढे बघा काय होतंय, असं सूचक विधान नितेश राणे यांनी केलं.
सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंना महायुतीत न जाता मविआमध्ये येण्याचा सल्ला दिला. शिवाय महायुतीत बेरोजगारीचं प्रमाण वाढल्याचं त्या म्हणाल्या. यावर नितेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, लोकसभेनंतर मविआमध्ये सर्वच बेरोजगार होणार आहेत. मग त्याबद्दल सुप्रियाताईंनी थोडा विचार करावा. त्यामुळे महायुतीत काय चाललंय याबद्दल विचार करण्यापेक्षा बारामती मतदारसंघातही थोडं फिरावं, असा लहान भाऊ म्हणून ताईंना सल्ला देईन, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली.
राहुल गांधी यांनी शिवाजी पार्कवरील भाषणात शक्तीच्या विरोधात म्हणजे ईडी, सीबीआय विरोधात लढतोय, असं वक्तव्य केलं. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींनी हे वक्तव्य शिवाजी पार्कवर केल्यामुळे बाळासाहेबांनाही दुःख झालं असेल, असं म्हटलं. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले, यासाठी आदरणीय पंतप्रधान मोदीजींचं आपण कौतुक केलं पाहिजे. जेव्हा जेव्हा ते महाराष्ट्रात आले आहेत, मुंबईमध्ये जेव्हा जेव्हा मोदीजींची सभा झाली, मग ती २०१४ ची बघा, २०१९ ची बघा किंवा आताची बघा, आता तर कर्नाटकमध्ये जाऊनही त्यांनी बाळासाहेबांची आठवण काढली आहे आणि हे नालायक, नाकर्ते लोक शिवाजी पार्कमध्ये उभे राहून एकदाही राहुल गांधींनी बाळासाहेबांचं नाव घेतलं नाही. राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष हा हिंदूद्वेष्टी आहे. वायनाडमध्ये ते का निवडून येतात? कारण ९७ टक्के मुस्लिम मतदारसंघ आहे.
मी राहुल गांधींना आवाहन करेन की, हिंदू मतदारसंघात निवडून दाखवावं. म्हणून स्वतःच्या मतदारांना खूश करण्यासाठी त्यांना हिंदूद्वेष करावाच लागेल. शक्ती या शब्दाचा अर्थ हिंदू धर्मात फार मोठा आहे आणि त्या शक्तीला संपवण्याचा विचार जर राहुल गांधी करत असतील, तर नरेंद्र मोदींच्या रुपामध्ये चोख उत्तर ४ जूनला देशाची जनता देईल, हे राहुल गांधींनी बघत राहावं की शक्तीमध्ये किती ताकद आहे, असं नितेश राणे म्हणाले.
लोकसभेसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरुन प्रश्न विचारला असता नितेश राणे म्हणाले, किरण सामंत आणि माझी भेट झालेली नाही. १७ मार्चला आदरणीय निलेशजी यांचा वाढदिवस होता. राज्यभरातले आणि कोकणातले सर्व नेते त्यांना भेटायला आले होते. त्यांना भेटून गुच्छ देणं म्हणजे इलेक्शनची चर्चा समजत असाल, तर मग वाढदिवस साजरा करण्यापूर्वी थोडा विचार करायला हवा. आम्हाला जितकं माहित आहे, त्यानुसार रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर खासदार हा महायुतीचाच असेल. आता तो कोण असेल, हे येणार्या काही दिवसांमध्ये कळेल, असं नितेश राणे म्हणाले.
शिवाजी पार्कवर इंडिया अलायन्सच्या सभेला न झालेल्या गर्दीवर भाष्य करताना नितेश राणे म्हणाले, इंडिया अलायन्स हे बंद होणारं दुकान आहे. त्यांच्याकडे नेते, कार्यकर्ते उरलेले नाहीत. सगळे भाडोत्री लोकं त्यांनी तिथे जमवले होते. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांचं रटाळ भाषण ऐकण्यासाठी कोण जाणार? त्यांच्या घरचेही त्यांना बघायला येणार नाहीत. त्यामुळे जी वस्तुस्थिती आहे, इंडिया आघाडीची जी लायकी आहे त्या लायकीप्रमाणे लोक शिवाजी पार्कवर आले होते. त्यातले ९० टक्के लोक तर एकाच धर्माचे होते, असा टोलाही नितेश राणे यांना लगावला.
रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, शेतकरी दुःखी आहेत आणि अजित पवारांच्या एका मंत्र्यांने राजीनामा दिला आहे. यावेळेस त्यांनी धनंजय मुंडेंकडे इशारा केला आहे. यावर नितेश राणे खोचकपणे म्हणाले की, मला माहित नव्हतं की रोहित पवार मंत्रालयात हाऊकिपिंगमध्ये चहा पाजण्याचं देखील काम करतो. तो मल्टिटॅलेंटेड मुलगा आहे. साखर पण बनवतो, चहा पण पाजतो. मंत्रालयात काय चाललंय हे मंत्रालयात नसताना जर रोहित पवारला माहित असेल तर लवकरच एफबीआयने त्याला घ्यावं, असं नितेश राणे म्हणाले.
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…