नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नादब्रम्ह कला केंद्राच्या स्थापनेसाठी गुजरातची राजधानी गांधीनगर येथील आपली जमान दान केली आहे. भारताच्या सांस्कृतिक परंपरेबाबतचा आपला सन्मान आणि प्रतिबद्धता दाखवत पंतप्रधान मोदींनी ही जमीन दान केले. ही जमीन पंतप्रधान मोदी आणि भाजपचे दिवंगत नेते अरूण जेटली यांना दिली गेली होती. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी संगीत परंपरेला चालना देण्यासाठी तसेच संरक्षित करण्यातसाठी ही दान केली.
पंतप्रधान मोदींनी जी जमीन दान केली आहे ती गांधीनगर येथील सेक्टर १मध्ये आहे. येथे आता नादब्रम्ह कला केंद्राची स्थापना केली जाईल. यामुळे संगीत क्षेत्रातील योगदान वाढेल. सरकारच्या माध्यमातून ही जमी पंतप्रधान मोदी आणि भाजप नेते अरूण जेटली यांना देण्यात आली होती. आता ही जमीन नादब्रम्हच्या स्थापनेची जबाबदारी सांभाळत असलेल्या मानमंदिर फाऊंडेशनला सोपवण्यात आली आहे. हे फाऊंडेन येथे एक चांगले केंद्र बनवतील.
संगीताचे मुख्य केंद्र बनवणार नादब्रम्ह कला केंद्र
मनमंदिर फाऊंडेशनच्या देखरेखीखाली बनणारे नादब्रम्ह कला केंद्र संगीताचे एक मुख्य केंद्र असेल. येथे भारतीय संगीत कलेच्या विविध पैलूंची माहिती दिली जाईल. या नादब्रम्ह कला केंद्राची निर्मिती ही भारतीय संगीताच्या विविध शैली आणि परंपराना लक्षात घेता त्यांचा प्रसार करण्याच्या दृष्टीने केली जात आहे. या संस्थानाचा हेतू संगीत शिकवणे आणि क्रिएटव्हिटीसाठी चांगला मंच उपलब्ध करून देणे हा आहे.
१६ मजल्यांचे असणार नादब्रम्ह कला केंद्र
नुकतेच मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गुजरातचे भाजपचे प्रमुख यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींनी दान केलेल्या जमिनीचे भूमीपूजन करण्यात आले होते. येथील हे नादब्रम्ह कला केंद्र १६ मजल्यांचे असणार आहे.