उन्हाळ्यात दही खाण्याची ही आहे योग्य पद्धत, नाही होणार आरोग्याचे नुकसान

  104

मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसांत पोट थंड ठेवण्यासाठी दहीपेक्षा चांगला पर्याय दुसरा नाही. ताक अथवा गोड लस्सी या कोणत्याही रूपात तुम्ही दही खाऊ शकता. मात्र काही लोकांना उन्हाळ्याच्या दिवसांत दही खाल्ल्याने त्रास होतो. जसे मुरूमे, अॅलर्जी, पाचनसंबंधी समस्या, शरीरामध्ये उष्णता वाढणे इत्यादी.


उन्हाळ्यात दही खाणे शरीरासाठी फायदेशीर असते मात्र अधिक प्रमाणात खाल्ल्यास त्यामुळे नुकसान होते. दह्याची प्रकृती उष्ण असते. त्यामुळे जेव्हा उन्हाळ्यात काहीजण दही खातात तेव्हा शरीरातील उष्णता वाढते. यामुळे चेहऱ्यावर मुरुमे, पुटकुळ्यासारख्या समस्या येतात.



उन्हाळ्यात दही खाण्याची योग्य पद्धत


लस्सी अथवा ताक तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांत पिऊ शकता. कारण रिसर्चनुसार जेव्हा आपण दह्यामध्ये पाणी मिसळतो तेव्हा त्याची प्रकृती बॅलन्स होते. यामुळे दह्यातील उष्णता कमी होते. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही उन्हाळ्यात दही खात असाल तर त्यात पाणी मिसळून चांगले फेटून खा. यामुळे शरीराला थंडावा मिळेल. तसेच आरोग्यासही अनेक फायदे होतील.


डिस्क्लेमर - वरील लेखात दिलेली माहिती ही मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे. कोणत्याही प्रकारचा सल्ला अंमलात आणण्याआधी संबधित तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी