शिर्डी लोकसभा मतदारसंघातून खासदार सदाशिव लोखंडेना तीव्र विरोध

Share

शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे : लोखंडे नको सक्षम उमेदवार द्यावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शिर्डी : महाराष्ट्रात शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात आहे. याठिकाणी तीन वेळा शिवसेनेचाच खासदार निवडून आलेला आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच शिर्डी मतदारसंघातील सहा तालुक्यामधील शिंदे गटाचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी राजीनामे देत खा.सदाशिव लोखंडे यांना तीव्र विरोध दर्शविला असून आता लोखंडे नको सक्षम उमेदवार द्यावा,अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची स्पष्टोक्ती महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख तथा नगराध्यक्षा अनिताताई जगताप व शिर्डी नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

दरम्यान, देशात होऊ घातलेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून आचारसंहितेच्या दोन दिवस अगोदर ऐन तोंडावर शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार द्यावा, यासाठी भाजपच्या सहा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील दुजोरा देत जनतेची मागणी आहे तीच माझी सुध्दा असल्याचे सुतोवाच केले होते.त्यामुळे महायुतीमध्ये शिर्डी लोकसभेची जागा कोणाकडे जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटात दुफळी निर्माण झाल्याने आता उत्तर नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपुर्द केले असल्याचे सांगण्यात आले आहे.त्यामुळे खासदार सदाशिव लोखंडे यांना मोठा धक्का बसणार आहे. एकंदरीतच निवडणुकीच्या तोंडावर खा.लोखंडे यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला जात आहे का असाही प्रश्न उपस्थित केला जात असून, शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांची अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. याविषयी शिर्डी नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा अनिताताई जगताप बोलतांना म्हणाल्या की, उत्तर अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेची मी एकमेव नगरसेविका आहे. असे असतानाही माझ्यासह सहा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खासदार लोखंडे विश्वासात घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

याउलट प्रामाणिकपणे काम करणाऱ्या राजेंद्र देवकर सारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला जिल्हाप्रमुख पदावरून पायउतार केले आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा फक्त राहाता आणी कोपरगांव या दोन्ही तालुक्यापुरताच मर्यादित नाही तर या मतदारसंघात ६ तालुके आहेत याचे भान ठेवायला हवे होते.तर माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप म्हणाले की, शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार द्यावा अशी मागणी केली आहे. त्यांची मागणी योग्य जरी असली तरी देखील उमेदवार हा शिंदे गटाचा आणि सक्षम असेल, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. खा. लोखंडे यांनी दहा वर्षांत मतदार संघात कोणतीही विकासकामे केली नाही.आंतराष्ट्रीय शिर्डी तिर्थक्षेत्राचा विकास झाला नाही ही शोकांतिका आहे. याउलट अयोध्येत राममंदिराची भव्य उभारणी झाली. तेथे विकासाला मोठ्या प्रमाणात गती मिळाली असून जगभरातील पर्यटक भेट देत असल्याचे त्यांनी सांगितले.

राहाता उपतालुकाप्रमुख सुभाष उपाध्ये म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे भाजपने अबकी बार चारसो पार हा नारा दिला आहे. पण जर लोखंडे यांना उमेदवारी दिली तर अबकी बार चारसो ऐवजी ३९९ असे चित्र बघायला मिळेल, असे होऊ नये यासाठी लोखंडे नको सक्षम उमेदवार द्यावा, अशी मागणी केली. याप्रसंगी जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिताताई जगताप,माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख पूनम जाधव, संगमनेर तालुक्यातील वडगांव पान येथील उपजिल्हाप्रमुख अर्जुन काशिद, अकोले तालुक्यातील राजूर येथील शहरप्रमुख विक्रम जगदाळे, श्रीरामपूर तालुकाप्रमुख बापूसाहेब शेरकर, युवा शहरप्रमुख रामपाल पांडे, राहाता उपतालुकाप्रमुख सुभाष उपाध्ये, शिर्डी शहर संघटक नानक सावंत्रे आदी पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर यांच्याकडे सुपूर्द केले असून सदरचे राजीनामे त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले असल्याचे म्हटले.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार द्यावा या भाजपच्या मागणीला आमचा विरोध नाही, महायुतीच्या वतीने जो उमेदवार दिला जाईल तो आम्हाला मान्य राहील.मात्र शिर्डी मतदारसंघात पुढील खासदार सदाशिव लोखंडे हेच असतील आणी पुन्हा तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी दिसतील. – कमलाकर कोते – शिवसेना जिल्हाप्रमुख, उत्तर नगर

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

5 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

6 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

6 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

7 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

7 hours ago