चंदीगड : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections) सर्व राजकीय पक्ष (Political Parties) चर्चा, बैठका, दौरे करत असताना हरियाणामध्ये एका मोठ्या राजकीय नाट्याने (Haryana Politics) खळबळ उडवली आहे. हरियाणात भाजप-जेजेपी (BJP-JJP) युती तुटली आहे. चंदीगडमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (Manohar lal Khattar) आपल्या मंत्रिमंडळासह राजभवनात पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा (Resignation) राज्यपालांकडे सुपूर्द केला. आज दुपारी एक वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
हरियाणाच्या विधानसभेत एकूण ९० आमदार असल्याने बहुमतासाठी ४६ मतांची गरज असते. भाजपाकडे ४१ आमदार होते व त्यांच्यासह जननायक जनता पार्टी (JJP) या दुष्यंत चौटाला यांच्या पक्षाचे १० आमदार निवडून आले होते. त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला आणि युती केली. हरियाणा नॅशनल लोकदल पार्टी या एकमेव आमदार असलेल्या पार्टीनेदेखील भाजपाला पाठिंबा दिला. यासह सात अपक्ष आमदारांचाही भाजपाला पाठिंबा होता. अशा प्रकारे बहुमताचं सरकार होतं.
मात्र जेजेपीने लोकसभेसाठी आपल्याला काही जागा मिळाव्यात अशी मागणी भाजपाकडे केली. भाजपाने ती मागणी मान्य केली नाही. त्यानंतर दुष्यंत चौटाला यांनी त्यांच्या आमदारांची दिल्लीत बैठक बोलावली होती. मात्र, त्यांच्याच पक्षाचे अनेक आमदार बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. दरम्यानच्या काळात, आज सकाळी भाजपनेच थेट आपल्या सरकारचा राजीनामा दिला आहे.
या राजकीय नाट्यानंतर आजच हरियाणामध्ये नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मनोहरलाल खट्टर यांनाच पुन्हा मुख्यमंत्री पद दिलं जाणार का, हा एक मोठा प्रश्न आहे. भाजप-जेजेपी युती तुटली तरीदेखील त्याचा भाजपवरती मोठा परिणाम होणार नसल्याचे दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे भाजपचे ४१ आमदार असून ७ अपक्षही त्यांच्या समर्थनात आहेत. दरम्यान, हलोपाचे आमदार गोपाल कांडा यांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपला बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त जागा मिळत आहेत.
दंडासह पुढील २ वर्षांसाठी निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास बंदी मुंबई (प्रतिनिधी) : आरे वसाहतीतील रस्त्यांच्या…
एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यातही मूर्ती कार्यशाळा बंद, मूर्तिकारांपुढे मोठा पेच मुंबई (प्रतिनिधी) : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या…
सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते होणार या पुरस्कारांचे वितरण मुंबई (प्रतिनिधी): यावर्षीच्या मंगेशकर पुरस्कारांची घोषणा करण्यात…
यमुंबई: इंडियन प्रीमियर लीगमधील ३२व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना सुपर ओव्हरपर्यंत…
मुंबई : येत्या काही दिवसांत मुंबईकरांना उष्णतेसह वाढत्या आर्द्रतेचा तडाखा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.…
मुख्यमंत्री फडणवीसांची शेतकऱ्यांना भावनिक साद अमरावती : विदर्भातील अमरावती येथे विमानतळाचे लोकार्पण केल्यानंतर विदर्भातील प्रकल्पग्रस्त…