Marathi Biopic : 'स्वरगंधर्व सुधीर फडके'चा उत्कंठावर्धक दुसरा टिझर रिलीज

  256

आजपर्यंतचा सर्वात मोठा स्वरमयी बायोपिक


मुंबई : मराठी सिनेसृष्टीत (Marathi Film Industry) अनेक नवनवे विषय हाताळले जातात. त्यातच मराठीत जीवनपटांनांही (Biopics) प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देतात. ज्येष्ठ गायक, अभिनेते व संगीतकार वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर बेतलेला ‘मी वसंतराव’ तर शाहीर साबळे यांच्या जीवनावर बेतलेला ‘महाराष्ट्र शाहीर’देखील चांगलाच गाजला. असाच एक नवाकोरा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'स्वरगंधर्व सुधीर फडके' (Swargandharva Sudhir Phadake) असं या चित्रपटाचं नाव असून सुप्रसिद्ध गायक सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे.


सुधीर फडके म्हणजेच सगळ्यांचे लाडके बाबूजी यांची सखी मंद झाल्या तारका, तोच चंद्रमा नभात, धुंद एकांत हा ही प्रेमगीते तर कानडा राजा पंढरीचा, देहाची तिजोरी, विठ्ठला तू वेडा कुंभार यांसारखी अनेक भक्तिगीते मराठी रसिकांच्या मनाला आजही तितकीच भुरळ घालतात. त्यांच्या या गायकीचा प्रवास 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या सिनेमातून उलगडण्यात येणार आहे. प्रसिद्ध अभिनेता सुनील बर्वे (Sunil Barve) या चित्रपटात सुधीर फडके यांची भूमिका साकारणार आहे.


गेल्यावर्षी २५ जुलै म्हणजेच बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाचा दुसरा टीझर आज (Teaser out) प्रदर्शित करण्यात आला. टीझरमधून प्रेक्षकांना बाबूजी यांच्या संगीतक्षेत्रातील प्रवासाबद्दल बरीच नवी माहिती मिळणार आहे याचा अंदाज येत आहे. तसेच या चित्रपटातील त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यातीलही बऱ्याच गोष्टींवर प्रकाश टाकला जाणार आहे हे या टीझरमधून स्पष्ट होत आहे.


टीझरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात मागे ऐकू येणारी बाबूजी यांच्याच सुमधुर आवाजातील गाणी आणि त्याच्याशी साधर्म्य साधणारे दृश्य. यामुळे हा टीझर प्रेक्षकांना आणि खासकरून बाबूजींच्या चाहत्यांना भावला आहे. बाबूजी यांच्या जीवनातील वेगवेगळे टप्पे यात पाहायला मिळणर आहेत.



रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित, योगेश देशपांडे दिग्दर्शित या चित्रपटात सुनील बर्वे, आदिश वैद्य, शरद पोंक्षे, सागर तळाशीकर, मृण्मयी देशपांडे, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद योगेश देशपांडे यांचे असून सौरभ गाडगीळ, योगेश देशपांडे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट १ मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई