दुबई: भारताने(india) इंग्लंडला ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावल्यावर सलग चार सामने जिंकत मालिका ४-१ अशी खिशात घातली. टीम इंडियाचा हा मालिका विजय आयसीसीच्या रँकिंगमध्येही त्यांना फायदेशीर ठरला आहे. भारताने धरमशालामध्ये इंग्लंडला चांगलीच मात देत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी रँकिंगमध्ये पहिले स्थान मिळवले आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. या पद्धतीने भारतीय संघ खेळाच्या तीनही फॉरमॅटमध्ये आयसीसीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तालिकेत पहिल्या स्थानावर आहे.
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ख्राईस्टचर्च येथे सुरू असलेल्या सामन्याचा निकाल काहीही असला तरी रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ अव्वल स्थानावर कायम राहणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सध्याचा विजेचा ऑस्ट्रेलियाने वेलिंग्टनमध्ये पहिला कसोटी सामना १७२ धावांनी जिंकला होता आणि आता ते या मालिकेत १-० असे आघाडीवर आहेत.
भारताचे कसोटी रँकिंगमध्ये आता १२२ रेटिंग झाले आहेत जे ऑस्ट्रलियापेक्षा पाच अंकांनी अधिक आहे. इंग्लंडचा संघ १११ रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहेत. वनडेत भारताचे १२१ रेटिंग आहे तर ऑस्ट्रेलिया ११८ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीमध्ये भारताचे २६६ अंक आहेत. इंग्लंडचे या प्रकारात २५६ गुण असून ते दुसऱ्या स्थानावर आहेत.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…