घरगुती गॅस सिलिंडर १०० रुपयांनी स्वस्त

  140

महिला दिनी केंद्र सरकारची खास भेट


नवी दिल्ली : जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांना खास भेट दिली आहे. आजपासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. स्वत:नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली.


मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "आज महिला दिनानिमित्त आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे केवळ महिला शक्तीचे जीवन सुसह्य होणार नाही, तर करोडो कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल, पाऊल पर्यावरण संरक्षणासाठी देखील उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य देखील सुधारेल", असेही मोदी म्हणाले.





मोदींनी महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या, त्यांच्या शक्ती, धैर्य आणि चिकाटीला सलाम केला आणि विविध क्षेत्रात त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. "आमचे सरकार शिक्षण, उद्योजकता, कृषी, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातील उपक्रमांद्वारे महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी वचनबद्ध आहे. गेल्या दशकातील आपल्या कामगिरीवरूनही हे दिसून येते."


जगभरात ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. युनायटेड नेशन्सने ८ मार्च १९७५ रोजी महिला दिन साजरा करण्याची सुरुवात केली. हा दिवस महिलांच्या समान हक्कासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.

Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये