मुंबई : मुंबईतील वरळी भागातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वरळी अभियांत्रिकी संकुलाजवळ स्थित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी साडे अकराच्या सुमारास अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी दवाखान्याची पाहणी करतानाच तपासणीसाठी आलेल्या रुग्णांशी देखील संवाद साधला.
मुंबईकरांच्या आरोग्य उपचारावरील खर्च कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आरोग्य आपल्या दारी मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेतून घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. एप्रिल पासून झिरो प्रिस्क्रीप्शन पॉलिसी देखील सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. (Free treatment for Mumbaikars; Zero prescription policy in Mumbai from April)
वरळीतील अभियांत्रिकी संकुलातील आपला दवाखान्यात मुख्यमंत्र्यांचे अचानक आगमन झाले. त्यांनी दवाखान्यातील, स्टोर रूम, औषध कक्ष, तपासणी खोली, स्वच्छ्ता गृह यांची पाहणी केली. यावेळी तेथे तपासणीसाठी आलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधत आपल्या दवाखान्याविषयी अनुभव विचारला. रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबईकरांना उपचारासाठी घराजवळच सोय व्हावी या संकल्पनेतून आपला दवाखाना मुंबईत २२६ ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत ४२ लाख नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. याठिकाणी उपचार मोफत, कॅशलेस, पेपरलेस मिळत आहेत.
मुंबईत आरोग्य आपल्या दारी मोहिमेतून घरोघरी आरोग्य तपासणी केली जाणार आहे. झीरो प्रिस्किपशन पॉलिसी एप्रिल पासून सुरू होणार आहे. त्यासाठी १५०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी मुंबई शहर जिल्हा पालक मंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू, डॉ. सुधाकर शिंदे, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, उपआयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…