Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीYogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी!

Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी!

पोलीस नियंत्रण कक्षात आला धमकीचा कॉल

लखनऊ : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र, यातील मुख्य आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली. त्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM Yogi Adityanath) यांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या (Lucknow) पोलीस नियंत्रण कक्षात आलेल्या या धमकीच्या कॉलने खळबळ उडवून दिली आहे.

लखनऊच्या पोलीस नियंत्रण कक्षाच्या सीयूजी क्रमांकावर एक कॉल आला. हा कॉल हेड कॉन्स्टेबल उधम सिंग यांनी घेतला. या कॉलमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. कॉन्स्टेबलने ‘तुम्ही कुठून बोलत आहात?’ असं विचारलं असता कॉलरने लगेचच कॉल डिस्कनेक्ट केला.

या प्रकरणी मध्य विभागातील महानगर कोतवाली येथील सुरक्षा मुख्यालयात तैनात हेड कॉन्स्टेबल उधम सिंग यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलीसांकडून तपास सुरू

कॉन्स्टेबलने तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना या फोनची माहिती दिली, त्यानंतर एकच गोंधळ उडाला. पोलीस आणि यंत्रणांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपींच्या शोधासाठी चार पथके तैनात करण्यात आली आहेत. सव्र्हेलन्स सेलच्या मदतीने धमकी देणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल ट्रेस केला जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात आहे. सीएम योगी यांना यापूर्वीही धमक्या आल्या आहेत.

तक्रारीत काय म्हटले आहे?

चीफ कॉन्स्टेबल उधम सिंग यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवारी रात्री १०.०८ वाजता एक कॉल आला होता. फोन करणाऱ्याने सीएम योगींना बॉम्बने उडवले जाईल असे सांगितले. उधम सिंह यांनी फोन करणाऱ्याचे नाव विचारले असता त्याने फोन कट केला. त्यानंतर उधम सिंह यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -