Sunday, July 6, 2025

PM Modi: पंतप्रधान मोदी तीन दिवसांत करणार ५ राज्यांचे दौरे

PM Modi: पंतप्रधान मोदी तीन दिवसांत करणार ५ राज्यांचे दौरे
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) ४ ते ६ मार्च दरम्यान तेलंगणा, तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारचा दौरा करणार आहेत. या दरम्यान ते ११०,६०० कोटी रूपयांहून अधिक योजनांचे उद्घाटन तसेच शिलान्यास करतील. पंतप्रधान मोदींनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून याची माहिती दिली.

या पोस्टमध्ये मोदी म्हणाले, दोन दिवसांमध्ये तेलंगणा, तामिळनाडू, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेईन. ज्या विकास कार्यांचे उद्घाटन केले जाईल ते लोकांच्या जीवनात मोठे बदल घडवतील.

पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या विधानानुसार ४ मार्चला सकाळी १०.३० वाजता पंतप्रधान मोदी तेलंगणाच्या आदिलाबाद येथे ५६००० कोटी रूपयांहून अधिकच्या विकासकामांच्या योजनांचे उद्घाटन, लोकार्पण आणि शिलान्यास करतील. यानंतर साडेतीन वाजता पंतप्रधान मोदी तामिळनाडूच्या कलपक्कम येथे जातील.

५ मार्चला सकाळी ११ वाजता पंतप्रधान मोदी तेलंगणाच्या संगारेड्डीमध्ये ६८०० कोटी रूपयांच्या विकासकामांचे उद्घाटन करतील. दुपारी ३.३० वाजता ओडिशाच्या जाजपूरमध्ये चांदीखोलेमध्ये १९६०० कोटी रूपयांहून अधिकच्या विकासकामांचे उद्घाटन केले जाईल.

६ मार्चला सकाळी १०.१५ वाजता कोलकातामध्ये १५४०० कोटी रूपयांच्या कनेक्टिव्हिटीच्या योजनांचे उद्घाटन तसेच शिलान्यस करतील. यानंतर दुपारी साडेतीन वाजता बिहारच्या बेतियामध्ये जातील. येथे १२८०० कोटी रूपयांच्या अनेक विकासकांमांचे उद्घाटन करतील.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा