S. Somnath ISRO : इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना कॅन्सरचे निदान

आदित्य एल-१ लाँचिंगच्या दिवशीच समजली होती बातमी; केला मोठा खुलासा...


चेन्नई : भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम 'चांद्रयान-३' (Chandrayaan-3) तसेच भारताची सौर मोहिम 'आदित्य एल-१’ (Aditya-L1) यामध्ये अत्यंत महत्त्वाचा वाटा असलेले इस्रोचे (ISRO) प्रमुख एस. सोमनाथ (S. Somnath) यांना कॅन्सरचे (Cancer) निदान झाल्याची बातमी समोर आली आहे. एका मुलाखतीत त्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. शिवाय आदित्य एल-१च्या लाँचिंग दिवशीच मला या आजाराबाबत कळलं, असं त्यांनी सांगितलं. चांद्रयान -३ मोहिमेपासून त्यांना आरोग्यविषयक समस्या सुरु झाल्या होत्या. मात्र, तेव्हा आपल्याला कर्करोग झालाय, याची त्यांना माहिती नव्हती, असंही त्यांनी यावेळेस सांगितलं.


सोमनाथ यांना कॅन्सर झाला आहे, याची माहिती मिळाल्यानंतर इस्रोमधील त्यांच्या सहकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला होता. मात्र, अशा आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी स्वत:ला आणि सहकाऱ्यांना सावरले. चांद्रयान मोहिनंतर त्यांनी पोटाचे स्कॅनिंग केले. तेव्हा त्यांना पोटाचा कॅन्सर झाला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पुढील उपचार घेण्यासाठी ते चेन्नईत गेले. त्यांना हा आजार अनुवंशिकतेने झाला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.


कॅन्सरचे निदान झाल्यानंतर एस. सोमनाथ यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर बऱ्याच काळापासून त्यांच्यावर किमोथेरपी सुरु आहे. स्कॅन, मेडिकल चेकअप्स अशा अनेक कठीण प्रक्रियांमधून गेल्यानंतर त्यांच्या तब्येतीत आता सुधारणा आहे. त्यांचा आजार आता बरा झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कर्करोगाशी झुंज देत असतानाच कुटुंबिय आणि सहकाऱ्यांनी त्यांना साथ दिली असल्याचे सोमनाथ यांनी स्पष्ट केले.



इस्रोचे सर्व मिशन पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही


एस. सोमनाथ म्हणाले, 'मला माहिती आहे की, कॅन्सर पूर्णपणे बरा व्हायला बराच वेळ लागेल. ही एक मोठी प्रक्रिया आहे. मात्र, ही लढाई मी लढेन आणि जिंकेन सुद्धा' असा विश्वास सोमनाथ यांनी व्यक्त केला. 'सध्या मी बराच रिकव्हर झालो आहे. मी केवळ चार दिवस रुग्णालयात होतो. त्यानंतर मी माझे काम देखील पूर्ण केले. अजूनही मी सातत्याने सर्व चेकअप करतोय. पण त्यासोबतच माझं काम आणि इस्रोचे मिशन यावर मी पूर्णपणे लक्ष केंद्रीत केले आहे. इस्रोचे सर्व मिशन पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही', असेही सोमनाथ यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

फक्त ६ वर्षांच्या मुलांनाच पहिलीत प्रवेश

दिल्ली सरकारने पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा केली निश्चित नवी दिल्ली  : दिल्ली सरकारने शालेय शिक्षणात एक

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या  : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे पुढील सरन्यायाधीश! चार दशकांहून अधिक अनुभव असणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या कार्याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

नवी दिल्ली: देशाचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश हा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही

राम मंदिराच्या दर्शनाची वेळ बदलली , जाणून घ्या अयोध्यातील दर्शनाची वेळ...

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम. दिवसेंदिवस प्रभू रामाचे दर्शन