Anant Radhika pre wedding : 'मॉम अ‍ॅण्ड डॅड टू बी' दीपवीरचा अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये धमाकेदार डान्स!

शाहरुख खानने दिल्या 'जय श्रीराम'च्या घोषणा


अंबानींच्या सोहळ्याला बॉलिवूडच्या कलाकारांची मांदियाळी


जामनगर : सोशल मीडियावर (Social Media) सध्या उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा चिंरजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याचा (Anant Ambani And Radhika Merchant pre wedding) वेगळाच माहौल आहे. देश विदेशातील खास पाहुण्यांसह अख्खं बॉलिवूड (Bollywood) या सोहळ्यासाठी गुजरातच्या जामनगरमध्ये (Jamnagar) दाखल झालं आहे. सेलिब्रिटीज आपल्या अकाऊंट्सवरही या सोहळ्याचा आनंद घेतानाचे फोटोज शेअर करत आहेत. त्यातच प्री वेडिंगमधील कालच्या एका कार्यक्रमात बॉलिवूडचं अत्यंत आवडतं आणि डॅशिंग जोडपं दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग (Deepika Padukone And Ranveer Singh) धमाकेदार डान्स करताना दिसलं. 'मॉम अ‍ॅण्ड डॅड टू बी' दीपवीरचा (Mom and Dad to be Deepveer) हा डान्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, त्यासोबत चाहतेदेखील त्यांना पाहून उत्साही झाले आहेत.


दीपिका लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली. त्यामुळे दीपिकाचं बाळ येण्यापूर्वीच त्याच्याविषयी चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत. पहिल्या दिवशीच्या सोहळ्यात दीपिका रिहानाचं (Rihanna) कॉन्सर्ट एन्जॉय करताना दिसून आली. तर दुसऱ्या दिवशी दीपिकाने रणवीर सिंहसोबत 'दिल धडकने दो' या सिनेमातील 'गल्लां गूडिया' गाण्यावर धमाकेदार डान्स केला. प्रेग्नंट दीपिकाने आपल्या नृत्याने उपस्थित असलेल्या मंडळींची मने जिंकली.


अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंगमध्ये दीपिका-रणवीरच्या रॉयल लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दीपिकाने सोनेरी रंगाचा लेहेंगा परिान केला होता. तर रणवीरने काळ्या रंगाचा खास आऊटफिट परिधान केला होता. BAFTA पुरस्कार सोहळ्यानंतर दीपिकाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर जोडप्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.





शाहरुखने दिल्या 'जय श्रीराम'च्या घोषणा


अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंगमधील बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये किंग खान होस्टिंग करताना दिसत आहे. मंचावर येताच सर्वात आधी त्याने जय श्री रामच्या घोषणा दिल्या. त्याच्या या कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.





अंबानींच्या सोहळ्याला बॉलिवूडच्या कलाकारांची मांदियाळी


दिग्गज सेलिब्रिटी, उद्योजक, क्रिकेटपटू आदी जामनगरमध्ये दाखल झाले आहेत. एवढंच नव्हे तर अख्खं बॉलिवूड सध्या जामनगरमध्ये आहे. अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, करीना कपूर, सैफ अली खान, तैमूर व जेह अली खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, राहा कपूर, नीतू सिंग, सोनम कपूर, सारा अली खान, सलमान खान, अशी अनेक दिग्गज मंडळी या सोहळ्याला उपस्थित आहेत.

Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी