वजन घटवण्यापासून ते चांगल्या पाचनक्रियेसाठी, तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे ताक

मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसांची सुरूवात होत आहे. उन्हाळा सुरू झाला की शरीरात पाण्याची कमतरता जाणवू लागते. अनेकदा उन्हामुळे डिहायड्रेशनचा त्रास जाणवतो. अशातच डॉक्टर या दिवसांमध्ये भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. उन्हाळ्याचा त्रास दूर करण्यासाठी काहीजण कोल्ड्रिंक पितात तक काहीजण लस्सी. मात्र यामुळे फक्त थोडा वेळच थंडावा जाणवतो पण हे आरोग्यासाठी हानिकारक असतात.


उन्हाळ्यात सर्वाधिक लाभदायक असते ते ताक. ताक पिण्याचे बरेच फायदे आहेत. यामुळे केवळ पाचनक्रियाच सुधारत नाही तर अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. तसेच वेगाने वजनही कमी होते.



डायजेशन सुधारते


ताक आपल्या पचनक्रियेसाठी वरदानाप्रमाणे आहे. ताकामध्ये चांगले बॅक्टेरिया आणि लॅक्टिक अॅसिड असते जे पचनासाठी मदत करतात. तसेच शरीरात मेटाबॉलिज्म वाढवतात.



ताजेतवाने वाटते


ताक आपल्या शरीराला थंडावा देते. जिरे, पुदिना आणि मीठासोबतचे ताक एक ग्लास प्याय्याने तहान भागली जाते.



डिहायड्रेशन रोखते


ताक दही आणि पाण्याने बनवले जाते. यात ९० टक्के पाणी आणि पोटॅशियमसारखे इलेक्ट्रोलाईट असतात. ताकामुळे शरीरात पाण्याची पातळी नियंत्रित राहते.



रोगप्रतिकारक क्षमता वाढते


रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आतडे चांगले असणे गरजेचे असते. ताक आतड्यांना निरोगी राखण्याचे काम करते. तसेच पचनक्रिया सुरळीत करते.

Comments
Add Comment

International Yoga Day 2026 : 'Yoga for Healthy Ageing' या संकल्पनेतून निरोगी आयुष्याचा मंत्र

२१ जून हा दिवस संपूर्ण जगासाठी आरोग्याचा उत्सव म्हणून ओळखला जातो. 'आंतरराष्ट्रीय योग दिन' जवळ येत असताना,

Magic of Science : आता 'मेंढीची लोकर' जोडणार मानवाची तुटलेली हाडे; संशोधनाला मोठे यश

LONDON: स्वेटर किंवा शालीसाठी वापरली जाणारी मेंढीची लोकर आता मानवी शरीराच्या उपचारासाठी वापरली जाणार आहे, हे ऐकून

शहरी जीवनातील वाढता मानसिक तणाव: ८२ टक्के नागरिक विळख्यात; अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात प्रगतीची शर्यत जिंकण्याच्या नादात माणूस स्वतःच्या आरोग्याकडे

JAMUN : हवामान बदलाचा 'गोड' साक्षीदार: उन्हाळ्याचा निरोप घेताना जांभळाचा मनसोक्त आनंद घ्या!

कडक उन्हाचा तडाखा आता ओसरू लागला असून, पावसाळ्याच्या पहिल्या सरींची चाहूल लागली आहे. ऋतू बदलाच्या या काळात

EAT GOOD : तुम्ही तुमच्या अन्नामुळेच आजारी पडत आहात का? जाणून घ्या सुरक्षित आहाराचे महत्त्व!

अन्न हे केवळ भूक भागवण्याचे साधन नसून ते आपल्या आरोग्याचा मुख्य आधार आहे. निरोगी जीवनासाठी सुरक्षित, पौष्टिक आणि

Thyroid : थायरॉईडच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका ; वेळीच लक्ष द्या !

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत थकवा किंवा वजनातील बदल या गोष्टी सामान्य मानल्या जातात. मात्र अनेकदा ही लक्षणे