'टीएमसी म्हणजे अत्याचार, भ्रष्टाचार आणि घराणेशाही; विश्वासघाताचे दुसरे नाव म्हणजे टीएमसी, गरिबांची लूट केली'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल


कृष्णनगर : लोकसभा निवडणुकीपूर्वी बंगाल दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. कृष्णनगरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, "टीएमसी हे अत्याचाराचे दुसरे नाव आहे. टीएमसी म्हणजे विश्वासघात, भ्रष्टाचार आणि घराणेशाही. टीएमसीने गरिबांची लूट केली आहे. ममता बॅनर्जींच्या टीएमसीला लोकांना गरीब ठेवायचे आहे. त्यामुळे पश्चिम बंगालचा विकास होणे आवश्यक आहे. मोदींनी पश्चिम बंगालला पहिले एम्स दिले आहे."


पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, "ही भूमी भगवान कृष्णाच्या भक्तीचे सर्वोच्च प्रचारक चैतन्य महाप्रभू यांची जन्मभूमी आहे. चैतन्य महाप्रभूंच्या चरणी नतमस्तक होतो. हे माझे सौभाग्य आहे की काही दिवसांपूर्वीच मला समुद्राच्या खोल पाण्यात जाऊन भगवान श्रीकृष्णाच्या प्राचीन भूमीला, भगवान श्रीकृष्णाने स्थापन केलेल्या द्वारका नगरीला नमन करण्याचे भाग्य लाभले."


"एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण इथे जमलेले पाहून 'एनडीए सरकार, ४०० पार' हे सांगण्याचा आत्मविश्वास मला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये हा माझा दुसरा दिवस आहे. गेल्या २ दिवसात मला बंगालसाठी विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्याची संधी मिळाली. यामुळे गुंतवणूक येईल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि शेजारच्या भागावर परिणाम होईल. मात्र, तृणमूल सरकारने बंगालच्या जनतेचा अपेक्षाभंग केला आहे, हे मान्य करावे लागेल. लोकांची ते सतत फसवणूक करत आहेत."


"बंगालमध्ये ज्या प्रकारे टीएमसी सरकार चालवत आहे, त्यामुळे बंगालची निराशा झाली आहे. पश्चिम बंगालच्या जनतेने मोठ्या अपेक्षेने टीएमसीला एवढा मोठा जनादेश वारंवार दिला आहे, पण टीएमसी हे अत्याचार आणि विश्वासघाताचे दुसरे नाव झाले आहे. तृणमूल काँग्रेससाठी बंगालचा विकास नसून भ्रष्टाचार आणि घराणेशाहीला प्राधान्य आहे" असे मोदींनी म्हटले. सभेला संबोधित करण्यापूर्वी त्यांनी एका सरकारी कार्यक्रमादरम्यान पश्चिम बंगालमध्ये १५,००० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले.

Comments
Add Comment

गोव्यात नाईटक्लबमध्ये अग्नितांडव, २५ जणांचा मृत्यू; चौघांविरोधात FIR, मॅनेजरला अटक

पणजी : उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील 'बिर्च बाय रोमियो लेन' या नाईटक्लबमध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या

कारवाई का करू नये ? केंद्र सरकारची 'इंडिगो'ला नोटीस

नवी दिल्ली : इंडिगो एअरलाइन्समधील ऑपरेशनल संकट दूर करण्यासाठी आणि सामान्य परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी

प्लास्टिकवर प्रक्रिया करून तरुण बनला करोडपती

कचऱ्याचे रूपांतरण संपत्तीत दिल्ली : दिल्लीतील एका तरुणाने प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक नवीन

भारताला खुणावतेय रशियन बाजारपेठ

२०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातले

जगभरातील बालमृत्यूच्या घटनांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी

नवी दिल्ली : जगभरात जवळपास १० लाख मुले पाच वर्षांचे वय गाठण्याआधीच मृत्युमुखी पडली. कुपोषणाशी संबंधित घटक-जसे की

२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार

मंत्री एस. जयशंकर यांची राज्यसभेत माहिती नवी दिल्ली : अमेरिकेने २००९ पासून एकूण १८,८२२ भारतीय नागरिकांना हद्दपार