Anant-Radhika pre wedding : मुकेश अंबानींच्या धाकट्या मुलाच्या प्री वेडिंगला पाण्यासारखा पैसा!

Share

एका परफॉर्मन्ससाठी पॉपस्टार रिहानाचं मानधन तब्बल ‘इतके’ कोटी!

केवळ कॅटरिंगचाच खर्च वाचून व्हाल थक्क

मुंबई : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरात सध्या लगीनघाई सुरु आहे. सोशल मीडियावर (Social Media) मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याचा (Anant Ambani And Radhika Merchant Pre wedding) एक वेगळाच माहोल आहे. देश-विदेशातील दिग्गज मंडळी त्यांच्या या सोहळ्याला उपस्थिती लावत आहेत. अगदी मार्क झुकरबर्गपासून (Mark Zuckerberg) ते बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि इतर कलाकार मंडळींना या सोहळ्याचं आमंत्रण आहे. अनंत-राधिकाच्याच प्री वेडिंगसाठी मुकेश अंबानींनी प्रचंड पैसा खर्च केला आहे. काही मीडिया रिपोर्टसमध्ये हा खर्च देण्यात आला आहे. यातील केवळ कॅटरिंगचा खर्च जरी ऐकला तरी सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळेल.

अनंत-राधिका यंदा जुलै महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. पण त्याआधी १ मार्च ते ३ मार्चपर्यंत प्री-वेडिंगचा कार्यक्रम गुजरातमधील जामनगरमध्ये सुरू आहे. छोट्या मुलाच्या प्री-वेडिंगमध्ये मुकेश अंबानींनी जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाला (Rihanna) बोलावलं आहे. सध्या रिहानाची जोरदार चर्चा रंगली आहे. रिहाना भारतात पोहोचली असून तिचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल झाले आहेत.

अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगला सोहळ्याला पॉपस्टार रिहानाचा काही तासांचा परफॉर्मन्स असणार आहे. पण या परफॉर्मन्ससाठी अंबानी कुटुंबाने तिच्यासाठी जे मानधन मोजलं आहे, ते ऐकून आपण थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. अंबानींनी रिहानासाठी तब्बल ५२ कोटी इतके रुपये मोजले आहेत. तसेच या संपूर्ण कार्यक्रमावर एक हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. याशिवाय केवळ कॅटरिंगवर १६५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षी १९ जानेवारीला अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांचा मोठ्या धुमधडाक्यात साखरपुडा झाला होता. माहितीनुसार, १२ जुलैला अनंत व राधिका यांचा मुंबईत शाही लग्नसोहळा होणार आहे.

Recent Posts

Indian Army : नदीची पातळी वाढल्याने भारतीय सैन्यदलाच्या रणगाड्यांचा मोठा अपघात!

दुर्घटनेत ५ जवान शहीद लेह : कारगिलच्या लेह जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.…

13 mins ago

UGC NET Exam : पेपरफुटी प्रकरणाला बसणार लगाम! आता ‘या’ पद्धतीने होणार परीक्षा

परीक्षेत नव्या विषयाची पडणार भर; तारखा जाहीर मुंबई : यूजीसी नेटचा पेपर (UGC NET Exam)…

22 mins ago

RBI Action : आरबीआयचा अ‍ॅक्शन मोड! नियमांचे उल्लंघन केलेल्या ‘या’ बँकेवर लाखोंची कारवाई

मुंबई : देशातील आर्थिक डबघाईला आलेल्या बँकांसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर आरबीआय (RBI) नेहमीच महत्त्वाची…

1 hour ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक २९ जून २०२४.

पंचांग आज मिती ज्येष्ठ कृष्ण अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा. योग शोभन. चंद्र राशी…

7 hours ago

जनहितैषी अर्थसंकल्प!

ज्या अर्थसंकल्पाची महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता व आतुरता होती, तो अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार…

10 hours ago