Banglore Blast : बंगळुरु कॅफेतील बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट! सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला आरोपी

रवा इडली घेतली, बॅग कॅफेमध्येच ठेवली आणि...


बंगळुरु : बंगळुरुच्या रामेश्वरम कॅफमध्ये (Rameshwaram cafe) काल दुपारच्या सुमारास बॉम्बस्फोट (Banglore Blast) झाला. यामध्ये ९ जण गंभीर जखमी झाले. सध्या त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. या बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. कॅफेमध्ये स्फोटकांची बॅग ठेवून जाणारा आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV Footage) कैद झाला आहे. फुटेजमध्ये त्याने चेहऱ्याला मास्क लावल्याचे दिसत आहे. मात्र, त्याच्या हालचाली स्पष्ट दिसत आहेत.


पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या सीसीटीव्ही चित्रणामध्ये टोपी आणि मास्क घातलेला एक व्यक्ती हातात आयईडी स्फोटकांनी भरलेली बॅग घेऊन कॅफेमध्ये येताना दिसत आहे. त्याने चष्माही लावला आहे. त्याने कॅफेत रवा इडलीची ऑर्डर दिली. नाश्ता घेतल्यानंतर तो बॅग तिथेच सोडून निघून गेला. आपली ऑर्डर घेऊन जातानाही तो दिसत आहे. तो गेल्यानंतर बॉम्बस्फोट झाला.


संशयित आरोपीसह असलेल्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. बंगळुरू पोलीस त्याची चौकशी करत आहेत. तसेच न्यायवैद्यकशास्त्र आणि बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी पुरावे शोधण्याचे काम करत आहेत.



सात मिनिटे कॅफेमध्ये होता आरोपी


या स्फोटानंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. चेहरा ओळख प्रणालीद्वारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार आरोपीचे वय २५-३० असल्याचे सांगितले जाते. वरिष्ठ तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी एका बसमधून कॅफेजवळ उतरल्याचे दिसत आहे. कॅफेमध्ये इडली विकत घेण्यासाठी त्याने रोकड दिली होती. त्यानंतर तिथेच आपली बॅग सोडून जाताना तो दिसत आहे. कॅफेमध्ये त्याने सात मिनिटं घालवली.

Comments
Add Comment

कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार

बंगळुरू : कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला आयपीएलच्या राज्यातील शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार आहेत.

लडाखमध्ये हिमस्खलन, सात जणांचा मृत्यू; श्रीनगर-लेह महामार्ग बंद

लडाख : लडाखमधील झोजी ला येथे श्रीनगर-लेह महामार्गावर झालेल्या हिमस्खलनात अनेक वाहने बर्फाखाली गाडली गेली.

महाराष्ट्र आणि गोव्याला पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानाअंतर्गत ५९२ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी प्राप्त

नवी दिल्ली : केंद्र सरकारने, पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी, महाराष्ट्र आणि

एस-400 मिसाइलसह संरक्षण उपकरणांच्या खरेदीस मंजुरी

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण मंत्रालयाने हवाई दलासाठी रशियाकडून एस-400 एअर डिफेन्स सिस्टमची अतिरिक्त बॅटरी खरेदी

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्त्वात उच्चस्तरीय गटाची स्थापना

- पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या

PM Narendra Modi : युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी करणार सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच शुक्रवार २७ मार्च रोजी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ