Bollywood Cinema : बॉलिवूडमधील एका हिट चित्रपटाचा होणार हॉलिवूडमध्ये रिमेक!

'या' मराठी माणसाने केले होते दिग्दर्शन


मूळ मल्याळम चित्रपट, मग बॉलिवूड आणि आता थेट हॉलिवूड...


मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांचे रिमेक (Bollywood Remakes) होत असतात. मात्र, यावेळेस बॉलिवूडमधील एका हिट चित्रपटाचा थेट हॉलिवूडमध्ये (Hollywood) रिमेक होणार आहे. तसेच या चित्रपटाचा कोरिअनमध्येही रिमेक करण्याची तयारी सुरु आहे. हा चित्रपट म्हणजे अजय देवगण आणि तब्बू यांची प्रमुख भूमिका असलेला 'दृश्यम' (Drishyam). हा चित्रपट मूळ मल्याळम (Malayalam) इंडस्ट्रीत पहिल्यांदा प्रदर्शित झाला, ज्यात मोहनलाल (Mohanlal) या दाक्षिणात्य सुपरस्टारने प्रमुख भूमिका साकारली होती.


ट्रेड ॲनालिस्ट रमेश बाला यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून हॉलिवूड रिमेकविषयी माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, 'पॅनोरमा स्टुडिओ 'दृश्यम' फ्रँचायझी हॉलिवूडमध्ये नेण्यासाठी तयार आहे. भारत आणि चीनमध्ये बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्यानंतर निर्माता कुमार मंगत पाठक आणि पॅनोरमा स्टुडिओने 'दृश्यम' हॉलिवूडमध्ये बनवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी गल्फस्ट्रीम पिक्चर्स आणि जोट फिल्म्सशी हातमिळवणी केली आहे.



कोरियन व्हर्जनवरही काम सुरू


रमेश बाला यांनी सांगितले की पॅनोरमा स्टुडिओने मूळ निर्माता असलेल्या आशीर्वाद सिनेमाकडून मल्याळम चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय रिमेक हक्क विकत घेतले आहेत. हॉलिवूडबरोबरच 'दृश्यम' फ्रँचायझीच्या कोरियन व्हर्जनवरही काम सुरू आहे. मल्याळम चित्रपट 'दृश्यम' चे रिमेक हिंदी, कन्नड, तेलुगू, तमिळ, सिंहली आणि चीनी अशा विविध भाषांमध्ये रिमेक झाले आहेत.



आजही दृश्यमची तितकीच क्रेझ


'दृश्यम' व 'दृश्यम २' असे दोन्ही भाग प्रचंड गाजले. बॉलिवूडमधील 'दृश्यम' ३१ जुलै २०१५ रोजी प्रदर्शित झाला होता. आज जवळजवळ नऊ वर्षे उलटल्यानंतरही २ ऑक्टोबर या दिवशी विजय साळगांवकर आणि सत्संगचे मीम्स हमखास व्हायरल होतात. ज्यांनी चित्रपट पाहिला असेल त्यांच्या ही गोष्ट लगेच लक्षात येईल.



'या' मराठी माणसाने केले होते दिग्दर्शन


या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचेही प्रचंड कौतुक झाले. मूळ मल्याळम सिनेमात जीतू जोसेफ (Jeethu Joseph) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तर, बॉलिवूड रिमेकचे दिगदर्शन निशिकांत कामंत (Nishikant Kamat) या मराठी दिग्दर्शकाने केले होते. 'दृश्यम ३' च्या कथानकाची जुळवाजुळव सुरू असल्याचे वृत्त होते. या सिक्वेलमध्ये मोहनलाल आणि अजय देवगण एकत्र झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.


Comments
Add Comment

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका