Monday, May 12, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

वयाच्या २५व्या वर्षी अनन्या पांडेने खरेदी केले पहिले घर, पाहा अलिशान घराची सफर

वयाच्या २५व्या वर्षी अनन्या पांडेने खरेदी केले पहिले घर, पाहा अलिशान घराची सफर

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने २५व्या वर्षी आपले पहिले घर खरेदी केले आहे. तिने या घराची झलक चाहत्यांना दिली आहे. इतक्या लहान वयात तिने अलिशान असे घर बनवले आहे. हे घर गौरी खानने डिझाईन केले आहे.


वॉक इन क्लाजेट आणि ऑल व्हाइट लिव्हिंग रूम असलेल्या अलिशान घराची सफर अनन्याने आपल्या चाहत्यांना दिली आहे. यात घरात सुंदर फर्निचरसोबत बारीक डिटेल्सही आहेत.


पेशाने इंटीरियर डिझाईयनर असलेल्या गौरी खानने घराचा रंग सोबर ठेवला आहे. मुलाखतीत तिने सांगितले की लिव्हिंग रूममध्ये ती तिचा बराच वेळ घालवते. आपल्या स्वत:च्या घरात शिफ्ट होण्याआधी अनन्या पांडे आपले आई-वडील चंकी पांडे आणि भावनासोबत राहत होते. ती म्हणाले तिचे नवे घर म्हणजे ती मोठी झाल्याची निशाणी आहे.


 



अनन्या पांडेच्या मते, ती नेहमी विचार करायची की जर ती एकटी राहील तर हे करेल ते करे. तिला स्वत:ची कटलरी स्वत: खरेदी करायची होती.तिला आपल्या अंदाजात लोकांना होस्ट करायचे होते.


अनन्यांच्या घरात मोठा लिव्हिंग रूम आहे. सोबतच डायनिंग टेबल, कॉफी टेबल आणि टीव्ही बघण्यासाठी वेगळा एरिया आहे.


अनन्याचे हे घर पाहण्यासारखे आहे. या अलिशान घराला अनन्याने कोट्यावधी रूपयांना खरेदी केले होते. तिच्या कामाबाबत बोलायचे झाल्यास अनन्याला शेवटच्या 'खो गए हम कहां' या सिनेमात पाहिले होते.

Comments
Add Comment