1993 Serial Bomb Blast : १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अब्दुल करीम टुंडाची निर्दोष मुक्तता

अजमेरच्या टाडा कोर्टाने दिला निर्णय


मुंबई : १९९३ मध्ये मुंबई, कानपूर, हैदराबाद, सुरत आणि लखनऊच्या काही ट्रेनमध्ये एकापाठोपाठ एक स्फोट (1993 Serial Bomb Blast) झाले होते. या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अब्दुल करीम टुंडा (Abdul Karim Tunda) याची राजस्थानमधील अजमेरच्या टाडा न्यायालयाने (Tada Court) निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल ३१ वर्षांनतर तो निर्दोष असल्याचा निकाल देण्यात आला आहे. यासह टाडा न्यायालयाने इरफान आणि हमीदुद्दीन यांना दोषी घोषित केले आहे.


१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अब्दुल करिब टुंडा, इरफान आणि हमीमुद्दीन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. सीबीआयने टुंडाला या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड मानले होते आणि त्याला २०१३ मध्ये नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली होती. सर्व आरोपींविरुद्ध टाडा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत दीडशेहून अधिक जणांची साक्ष झाली आहे.



कोण आहे टुंडा?


मुंबई बॉम्बस्फोटात सहभागी होण्यापूर्वी टुंडाने जलीस अन्सारी सोबत मुंबईतील मुस्लिम समाजासाठी काम करण्याच्या उद्देशाने 'तन्झीम इस्लाह-उल-मुस्लिमीन' या संघटनेची स्थापना केली. मध्य दिल्लीतील दर्यागंजमधील छत्तालाल मियाँ भागात एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या टुंडाने उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील पिलखुआ गावातील बाजार खुर्द भागात आपल्या मूळ गावी सुतार म्हणून काम करायला सुरुवात केली. तो त्याच्या वडिलांना मदत करू लागला.


वडिलांच्या मृत्यूनंतर टुंडाने उदरनिर्वाहासाठी भंगाराचे काम सुरू केले आणि कट्टरपंथी जिहादी दहशतवादी बनण्यापूर्वी कपड्यांचा व्यवसायही केला. ८० च्या दशकात तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लष्कर-ए-तैयबाच्या संपर्कात आला. टुंडाने मूलतत्त्ववाद स्वीकारला. अब्दुल करीम टुंडा लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय आहे. टुंडाने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडून दहशत पसरवण्याचे प्रशिक्षण घेतल्याचा दावाही केला जात आहे.



टुंडावर आणखी काही दहशतवादाचे खटले


अब्दुल टुंडावर देशात विविध ठिकाणी दहशतवादाचे खटले प्रलंबित आहेत. त्याने तरुणांना भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे. जुनैद या पाकिस्तानी नागरिकासह त्याने १९९८ मध्ये गणेशोत्सवादरम्यान दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखल्याचेही बोलले जाते.

Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर