नवी मुंबई(मच्छिंद्र पाटील) – नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ऐरोली येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य शिवस्मारकाच्या भुखंडाची पाहणी शिवसेना (शिंदे गटांचे) जिल्हा अध्यक्ष विजय चौगुले यांनी केली. लवकरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवस्मारकाच्या कामांचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती विजय चौगुले यांनी दिली.
ऐरोली मध्ये शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे यासाठी शिवसेना शिंदे गटांचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. चौगुले यांच्या पाटपुराव्याला यश आले असून स्मारकांसाठी ऐरोली सेक्टर १० ए येथील भुखंड क्रमांक २० हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांसाठी ५ हजार स्केवर फुट चा भुखंड सिडकोकडून पालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आला.
या भुखंडावर स्मारक उभारण्याच्या कामाची वर्कऑर्डर(कार्यादेश) देण्यात आली असून १३ कोटी रुपये खर्च करुन शिवस्मारक साकरण्यात येणार आहे. हे स्मारक पुर्ण करण्यासाठी पालिकेने ठेकेदाराला दोन वर्षाचा कालावधी दिला आहे. पण हे स्मारक येत्या सहा महिन्यातच ठेकेदारांकडून पुर्ण करुन घेऊ असा विश्वास विजय चौगुले यांनी व्यकत केला आहे. या स्माकरांच्या ठिकाणी ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा ३६ फुटी पुतळा उभारण्यात येणार आहे. तर येथील शिवस्मारकांमध्ये शिवकालीन शस्त्र देखील या स्मारकांमध्ये ठेवण्यात येणार आहे. ऐरोली मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्माकर उभारण्यात येणार असल्यामुळे नवी मुंबईची आयकॉनिक म्हणून ओळख होणार आहे असे विजय चौगुले यांनी स्पष्ट केले.
ऐरोली मध्ये शिवस्मारक व्हावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर सिडकोकडून पालिकेला भुखंड मिळाला असून आता या स्माकरांच्या कामाची वर्क ऑर्डर ठेकेदाराला देण्यात आली आहे. येत्या आठवडयाभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या स्मारकांचे उद्घाटन होईल. स्मारकांसाठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला असला तरी सहा महिन्यात स्मारक तयार करण्यात येईल.
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…