मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Legislative Budget session) दुसर्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) सादर केला. राज्याच्या २०२४-२५ वर्षाच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला हा अर्थसंकल्प आहे. यावर ‘निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मांडलेला हा अर्थसंकल्प आहे’ अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तिघांनीही टोले लगावले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर, पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. अजित पवारांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. एकनाथ शिंदे हे अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचं कौतुक करत होते. त्यावेळी माध्यमांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारुन, उद्धव ठाकरे यांनी निवडणूक बजेट आहे, असं म्हटल्याचं सांगितलं. त्यावर मुख्यमंत्री प्रतिक्रिया देत असताना, अजित पवार मध्येच आले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली.
अजित पवार म्हणाले, ‘मी ज्यावेळी त्यांच्या (उद्धव ठाकरेंच्या) सरकारमध्ये होतो, त्यावेळी मी अर्थसंकल्प मांडल्यानंतर फार छान आहे, फार छान आहे म्हणायचे, आता मी इकडे आहे म्हणून असं म्हणतात, त्याला काय अर्थ आहे? अशी टीका अजित पवारांनी केली.
यानंतर लगेचच बाजूला उभे असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. “उद्धव ठाकरेंनी यापू्र्वी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या एका कार्यक्रमात म्हटलं होतं, मला अर्थसंकल्प कळत नाही, त्यामुळे त्यांच्यावर न बोललेलं बरं” असा टोला त्यांनी लगावला.
एकनाथ शिंदे यांनीही ‘विरोधकांकडे बोलण्याचे मुद्दे नाहीत, निवडणुका आहेत म्हणून बजेट मांडायचं नाही का?’, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंना चपराक लगावली.
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…