CM Eknath Shinde : 'एक पूरक असा अर्थसंकल्प' म्हणत मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

अंतरिम अर्थसंकल्पाबद्दल काय म्हणाले एकनाथ शिंदे?


मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Legislative Budget session) दुसर्‍या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) सादर केला. राज्याच्या २०२४-२५ वर्षाच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला हा अर्थसंकल्प आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अजितदादांचे भरभरुन कौतुक केले. 'एक पूरक असा हा अर्थसंकल्प आहे', असं मुख्यमंत्री म्हणाले.


मुख्यमंत्री म्हणाले, या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्बल घटक, महिला, शेतकरी, कामगार, तरुण, ज्येष्ठ सगळ्यांचाच समावेश केलेला आहे. मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा म्हणजे कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी इ. साठी या अर्थसंकल्पामध्ये निधी ठेवलेला आहे. एक पूरक असा हा अर्थसंकल्प आहे


रस्ते, ग्रामीण रस्ते, शहरी रस्ते या सर्वांना प्राधान्य दिले आहे. रेल्वे मार्गांना प्राधान्य दिलं आहे. आपले जे एअरपोर्ट आहेत त्यांची एयर कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे, यासाठी आपण तरतूद केली आहे. पोर्ट आहेत ते डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण प्राधान्य देत आहे. कारण पायाभूत सुविधेमध्ये जे राज्य पुढे असते त्याचा विकास आणि प्रगती वेगाने होत असते. म्हणून पायाभूत सुविधांना देखील मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले आहे.


दरम्यान, 'निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मांडलेला हा अर्थसंकल्प आहे' अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. यावर 'विरोधकांकडे बोलण्याचे मुद्दे नाहीत, निवडणुका आहेत म्हणून बजेट मांडायचं नाही काय?', असा सवाल उपस्थित करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना चपराक लगावली.

Comments
Add Comment

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना