यूपीए सरकारच्या काळातील भ्रष्टाचार आणि घोटाळे जनतेसमोर आणा - गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पेण(देवा पेरवी) - देशातील लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबकी बार चारशे पार अशी घोषणा करत आपल्या पक्षाचे प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. त्याच धर्तीवर आज रायगड लोकसभा मतदार संघातील भाजपचा युथ कार्यकर्ता मेळावा पेण येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी रायगड लोकसभा मतदार संघाचे निरीक्षक म्हणुन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित होते.


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात डेव्हलमेंट केली आहे. मात्र मागील दहा वर्षांचा विचार केला तर आत्ताच्या 18 ते 26 या वयोगटातील नव मतदारांना मोदींचे नेतृत्व माहीत आहे. पण यापूर्वी यूपीए सरकारच्या काळातील भ्रष्टाचार किंवा घोटाळ्यांचे कारनामे त्यांना माहीत नसतील तर ते बूथ कमिटीच्या कार्यकर्त्यांनी जनतेसमोर आणावेत असे आवाहन केले.


तर भाजपचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी विद्यमान खासदार सुनिल तटकरे यांना टोला लगावत सांगितले की, आजपर्यत जुन्या कार्यकर्त्यांनी या जिल्ह्यात भाजप जगवली. मात्र आत्ता युतीमध्ये येऊन डायरेक्ट जागेवर हक्क दाखवत असेल तर आम्ही शेती पिकावयाची, आम्ही कापणी, नांगरणी करायची आणि आत्ता आलेले जर शेतावर हक्क दाखवत असतील तर ते आमचे कार्यकर्ते स्वीकारु शकत नाहीत असे सांगितले.


तसेच आमदार रविशेठ पाटील यांनी थेट माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यावर टीका करत ज्या भाजप सरकार सोबत राहून ज्यांनी पाच पाच वेळा खासदार होऊन, केंद्रात मंत्रीपदे भूषवून सत्ता भोगली त्यांचे या रायगडच्या विकासासाठी योगदान काय आहे? रेल्वे, महामार्ग, बाळगंगा प्रकल्प, कारखानदारी यांसारखे किती प्रश्न दिल्ली दरबारी सोडविले असा सवाल केला.


यावेळी व्यासपीठावर रायगड, मावळ आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे केंद्रातील निरिक्षक तथा गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पेण चे विद्यमान आमदार रविशेठ पाटील, दक्षिण रायगड भाजप जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील, केलसेकर, भाजपाचे बाळासाहेब पाटील, महेश मोहिते, विक्रांत पाटील, बाळ माने, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील पेण विधानसभा प्रमुख प्रसाद भोईर, माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि पेण विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी यूवा, महिला मोठ्या संख्येने उपस्थिती होत्या.

Comments
Add Comment

Agriculture Department : कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा दणका; विभागीय चौकशीचे आदेश मुंबई : धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागात राष्ट्रीय

Akola ZP : अकोला शिक्षक बदली प्रकरणात मोठी कारवाई; 33 शिक्षक निलंबित, 65 जणांची वेतनवाढ रोखली

अकोला : अकोला (Akola) जिल्हा परिषद शिक्षण विभागातील आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रकरणात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील