Nashik News : रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात डॉक्टरवर वार करुन हल्लेखोर फरार

  180

नाशिकच्या सुयोग रुग्णालयातील धक्कादायक प्रकार


नाशिक : नाशिकच्या (Nashik) पंचवटी परिसरातील सुयोग रुग्णालयातून (Suyog Hospital) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काल रात्रीच्या सुमारास एका खासगी डॉक्टरवर प्राणघातक हल्ला करुन हल्लेखोर फरार झाला. महत्त्वाची बाब म्हणजे, रुग्णालयाच्याच अतिदक्षता विभागात (ICU) डॉक्टरवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्याचे कारण मात्र अस्पष्ट आहे.


काल रात्री या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. कैलास राठी असं हल्ला झालेल्या डॉक्टरांचं नाव आहे. सध्या डॉक्टरांवर उपचार सुरु असून या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.


नाशिकमध्ये यापूर्वीही डॉक्टरांवर हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत. २०२२ मध्ये नाशिकमध्ये प्रख्यात नेत्ररोगतज्ज्ञ अशी ओळख असलेल्या डॉक्टर प्राची पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतानाच आणखी एका महिला डॉक्टरवर हल्ल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरात घडली होती. एकाच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या अनिकेत डोंगरे नावाच्या वॉर्डबॉयने महिला डॉक्टरवर प्राणघातक हल्ला केला होता, ज्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर पुन्हा दोन वर्षांनी नाशिकमधून असाच प्रकार समोर आला आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरा खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Nagpur Temple Collapsed: महालक्ष्मी मंदिरातील निर्माणाधीन छत कोसळले, १७ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

कोराडीच्या महालक्ष्मी मंदिर परिसरातील घटना नागपूर:  नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथल्या महालक्ष्मी मंदिर

पुणे जिल्ह्याचा कायापालट होणार , ३ नव्या महापालिका तयार होणार

पुणे : पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मोठी

महाराष्ट्रातील सरपंचांना दिल्लीत मोठा मान

महाराष्ट्रातील १७ सरपंचांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी दिल्लीतून आमंत्रण नवी दिल्ली : यंदाच्या

जमीन विक्रीस हरकत घेणा-या आईचा गळा घोटला; नंतर केली आत्महत्या

लातूर : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे जमीन विक्रीच्या वादातून मुलाने वयोवृद्ध आईचा खून

अमरावतीत आईने मुलीला तर आत्याने भाच्याला दिले जीवनदान

अमरावती : संदर्भसेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) गेल्या दोन दिवसांत दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात आईने

महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा तत्काळ लागू करावा

मानसिक छळ, मारहाण, लैंगिक अत्याचार, आत्महत्येसारखे गंभीर प्रकार पुणे: महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा