लोकसभा निवडणुकीआधी शरद पवार गटाला मिळाले निवडणूक चिन्ह

  121

मुंबई: लोकसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला निवडणूक आयोगाकडून नवे चिन्ह मिळाले आहे. नव्या चिन्हामध्ये एक व्यक्ती तुतारी वाजतावात दिसत आहे. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या या चिन्हाबाबत पक्षाने म्हटले की ही गर्वाची बाब आहे.

पक्षाकडून करण्यात आलेल्या विधानानुसार,

"एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!"

“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच 'तुतारी' आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार'साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच 'तुतारी' पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!”

असे पक्षाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

याआधी शरद पवार गटाला निवडणूक चिन्ह म्हणून वटवृक्ष मिळाले होते. मात्र यावर विश्व हिंदू परिषदेने आक्षेप घेतला होता. विश्व हिंदू परिषदेचे म्हणणे होते की वटवृक्ष हे त्यांच्या संघटनेचे नोंदणीकृत चिन्ह आहे.

 



अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला होता. जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी राज्यातील महायुती सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली होती.

शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही फूट पडल्याने हे प्रकरणही निवडणूक आयोगाकडे गेले होते. हे प्रकरण गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित होते. याप्रकरणी एकूण १० सुनावण्या घेण्यात आल्या. या प्रत्येक सुनावणीवेळी शरद पवार हे जातीने हजर होते. निवडणूक आयोगाला दोन्ही गटाकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली होती.
Comments
Add Comment

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांसाठी चांगला प्रतिसाद

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाची ५ हजार २८५ घरे आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी आतापर्यंत ४० हजार ८२३ अर्ज दाखल झाले

अनधिकृत बांधकामांवर एमएमआरडीए आणणार नियंत्रण

अधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार मुंबई : नागरी विकासात शिस्तबद्धता आणि कायदेशीरतेला चालना

आशिष शर्मा यांच्याकडेच बेस्टची जबाबदारी

मुंबई : आर्थिक डबघाईस आलेल्या बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाची जबाबदारी आपल्या मर्जीतील सनदी अधिकाऱ्यावर

उबाठाचे १० ते १५ माजी नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, महिन्याभरात होणार प्रवेश

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठा सेनेला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येत्या

बेस्ट तोट्यात जाण्यास तत्कालीन सत्ताधारी उबाठा शिवसेनाच जबाबदार, काँग्रेसचा घरचा आहेर!

काँग्रेसचे माजी आमदार मधु चव्हाण यांचा आरोप भाडेतत्वावरील खासगी बसेस बंद करा मुंबई : बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात

Dadar Kabutar Khana Controversy: कबुतर खानाच्या राड्यानंतर देवेंद्र फडणविसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले "लोकांचे आरोग्य..."

मुंबई: मुंबईतील दादरमधील कबुतरखाना बंद करण्यावरून जैन समाज आज आक्रमक झाल्याचे दिसून आले. मुंबई उच्च