मुंबई : भूमी जिहाद, लव्ह जिहाद, हिंदू पलायन, ड्रग्ज अशा मुद्द्यांना विरोध करण्यासाठी सकल हिंदू समाजातर्फे मालाडच्या मालवणी-मढ भागात हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
३ मार्च २०२४ रोजी दुपारी ३ वाजता मालवणी गेट नं. ८ येथून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. भूमीरक्षा, लव्ह जिहाद, धर्मांतर या राज्यात बोकाळलेल्या वाईट गोष्टींना आळा घालण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. जास्तीत जास्त हिंदूप्रेमींनी या मोर्चात सहभागी व्हावे असं आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आलं आहे.