Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांचे चाललंय काय? ‘वंचित’ अजूनही काठावरच!

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) बिगुल लवकरच वाजणार आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. यात वंचित बहुजन आघाडीलाही सहभागी करून घेतल्याचे सांगण्यात आले आहे. पण वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मात्र वंचित बहुजन आघाडीला अजूनही महाविकास आघाडीत सहभागी करून घेतलेले नाही, आम्ही वाट पाहत आहोत, असे खळबळजनक वक्तव्य अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अहमदनगरमध्ये केले.


प्रकाश आंबेडकर म्हणाले, आधी शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात जागावाटप होईल. त्यानंतर आम्हाला पाहिजे असलेल्या जागांसाठी आम्ही तिन्ही पक्षांशी स्वतंत्र चर्चा करू. या पक्षांचे आपापसातील जागावाटप होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करू शकत नाही. त्यामुळे आम्ही सध्या थांबलो आहोत. आम्हाला ज्या जागा हव्या आहेत. त्या ठिकाणी सध्या आम्ही सभा, मेळावे घेत आहोत. राज्यातील ४८ जागांपैकी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांच्याकडे असलेल्या २८ जागांचे वाटप होईल. त्यानंतर आम्ही तिन्ही पक्षांबरोबर चर्चा करू, असे आंबेडकर म्हणाले.


नगर जिल्ह्यातील शिर्डीच्या जागेवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही दावा केला आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीची जिल्हा कार्यकारिणी आग्रही आहे. मात्र या जागेवर निवडणूक लढवण्यास मी इच्छुक नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट सांगितले. तरी देखील या जागेसाठी आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर चर्चा करू. मिळाली तर ठीक, नाही मिळाली तर नाही, असेही आंबेडकर म्हणाले.


दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांत बैठका होत आहेत. चर्चा सुरू आहेत. काही जागांवरून अडचणी निर्माण होत आहेत. २०१९ च्या निवडणुकीत ज्या जिंकल्या तितक्या जागांची मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्याने त्यांची राजकीय ताकद देखिल कमी झाली आहे. काँग्रेसलाही धक्के बसले आहेत. अशा परिस्थितीत जागवाटप कसे होणार, कुणाला किती जागा मिळणार आणि मग त्यात वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय असेल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती : समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली  आहे. महामार्ग जेवढा सोईस्कर आणि सुखकर

Raigad Ropeway: रायगडावर जाणे होणार स्वस्त! रोपवेचे तिकीट ३५० रुपयांवरून ५०-१०० रुपयांपर्यंत कमी होणार

रायगड : किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने रायगडावर नवीन रोपवे

Ketan Agrawal Murder Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट; लोहगडावर सिया गोयलकडून पोलिसांनी केले सीन रिक्रिएशन

पुणे : पुण्यातील (Pune) उद्योजक केतन अग्रवाल हत्या (Ketan Agrawal Murder) प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू असून पुणे ग्रामीण

Rajgad Accident : राजगडाच्या वाटेवर भीषण अपघात! पाबे घाटात मिनी बस २५ फूट दरीत कोसळली; दोन पर्यटकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

पुणे : किल्ले राजगड (Rajgad Fort) येथे पर्यटनासाठी (Tourism) निघालेल्या मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांच्या मिनी बसचा (Mini Bus) पुणे

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो