Thackeray group : ठाकरे गट पुन्हा अडचणीत! अनिल देसाई यांच्या पीएविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल

मनी लाँड्रिंग प्रकरणात केली कारवाई


मुंबई : लोकसभा निवडणुका (Loksabha Election) जवळ आलेल्या असताना ठाकरे गट (Thackeray group) मात्र अधिकाधिक अडचणीत सापडत चालला आहे. ठाकरे गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांविरोधात ईडीने (ED) गुन्हे दाखल केले आहेत. कोविड घोटाळ्यात (Covid scam) किशोरी पेडणेकर, संजय राऊत, सुजित पाटकर तर रविंद्र वायकर, वैभव नाईक, अनिल परब, राजन साळवी यांची नावेही आर्थिक घोटाळ्यांमध्ये सापडली आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चिंतेत असताना आणखी एक धक्का त्यांना पचवावा लागणार आहे. खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांचे खासगी सचिव दिनेश बोभाटे (Dinesh Bobhate) यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. बोभाटे तपास यंत्रणाच्या फेऱ्यात अडकल्यामुळे अनिल देसाई यांच्याही अडचणी वाढू शकतात.


ईडीकडून आज अनिल देसाई यांचे खासगी सचिव दिनेश बोभाटे यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. दिनेश बोभाटे यांच्यावर काही दिवसापूर्वीच सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्याआधारावरच आता ईडीने बोभाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.



काय आहे आरोप?


दिनेश बोभाटे यांच्या विरोधात २ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम बेहिशेबी कमवल्याचा आरोप करण्यात आला आहे. १७ जानेवारीला त्यांच्याविरोधात मुंबई कार्यालयात गुन्हा दाखल केला होता, आता ईडीकडूनही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश बोभाटे २०१३ ते २०२३ दरम्यानच्या कालावधीत एका इन्शुरन्स कंपनीत असिस्टंट आणि सिनियर असिस्टंट म्हणून काम करत होते. यादरम्यान त्यांनी संबंधित इन्शुरन्स कंपनीत काम करत असताना जवळपास ३६ टक्के बेहिशेबी मालमत्ता कमवल्याचा आरोप आहे.


Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी